करमाळावांगीसोलापूर जिल्हा

जिल्हा बॅकेच्या ‘थेट अल्पमुदत कर्ज’ योजनेतुन शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा; वांगी येथील शेतकरी मेळाव्यात आवाहन बँक प्रशासक कोतमीरे यांचे आवाहन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जिल्हा बॅकेच्या ‘थेट अल्पमुदत कर्ज’ योजनेतुन शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा; वांगी येथील शेतकरी मेळाव्यात आवाहन बँक प्रशासक कोतमीरे यांचे आवाहन

करमाळा(प्रतिनिधी) ; जिल्हा बॅकेच्या थेट अल्पमुदत पिककर्ज योजनेचा लाभार्थ्यानी लाभ घेऊन आपली प्रगती करावी असे आवाहन जिल्हा बॅकेचे प्रशासक शैलेष कोतमिरे यांनी केले. ते करमाळा तालुक्यातील वांगी -३ येथील शेतकरी मेळाव्यात थेट अल्प मुदत कर्ज या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळ्याचे सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे हे होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विठ्ठल रुक्मिणी च्या प्रतिमेचे पुजन उपस्थिताच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिनाथ कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन शहाजीराव देशमुख, पंचायत समिती चे माजी सदस्य रोहिदास सातव, वांगी सोसायटी चे माजी चेअरमन श्री रोकडे, सिनियर बँक इन्सपेक्टर अण्णासाहेब उर्फ अभयसिंह आवटे , पालक अधिकारी जयंत पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील ज्या ज्या बॅंकांनी पिककर्ज देण्याचे बंद केले त्यापैकी जिल्हा बॅक सोडल्यास कोणत्याही बॅकेने कर्ज वाटप चालू केले नाही. जिल्हा बॅकेनेच थेट अल्पमुदत कर्ज योजना चालु केली आहे.

हेही वाचा- वादात अडकलेल्या श्री.आदिनाथ साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार ऑनलाईन; पण सहभागाच्या नोंदणीसाठी कारखान्यावर मारा एक हेलपाटा, सभासद म्हणतात, वा रे नियोजन!

करमाळा शहरातील व्यावसायिकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह; आत्महत्या की खून.? शहरात खळबळ

याबरोबरच जिल्हा बॅकेने व्यवसायिक कर्ज सोनेतारण कर्ज,नोकरदाराना कर्ज, वाहन कर्ज, मायक्रो एटीएम,आदि योजना चालू केल्याने बॅकेची विश्वासार्हता वाढून बॅकेच्या ठेवीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे असेही कोतमिरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांनी संस्था सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना सांगून सर्वांनी एकत्र येऊन शंभर टक्के वसुली केल्यास प्रत्येकास कर्ज देता येणार असल्याचे सांगितले.

यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन शहाजी देशमुख यांनी आदिनाथ कारखान्याच्या व्यथा सांगून जिल्हा बॅकेचे प्रशासक शैलेष कोतमिरे यांनी राबवलेल्या कारभाराप्रमाणे आदिनाथ कारखान्यात कारभार झाला असता तर कारखाना उर्जित अवस्थेत आला असता अशी खंत व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पालक अधिकारी जयंत पाटील यांनी केले.

सर्वांचे स्वागत व आभार आण्णासाहेब आवटे यांनी मानले. यावेळी शाखा वांगी नंबर 3 येथील श्री शिवछत्रपती कृषी अँड सप्लायर्सचे मयुर रोकडे यांना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रिटेल कर्ज अर्थात व्यवसाय कर्ज 20 लाख रूपये यावेळी मंजूर करून त्याचे वितरण करण्यात आले. सदरचे कर्ज मंजुरीचे पत्र बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांचे हस्ते मयुर रोकडे यांना देण्यात आले.

यावेळी मयुर रोकडे यांच्या व्यवसायास स्वतः प्रशासक कोतमिरे यांनी भेट देऊन व्यवसायाची पाहणीही केली व कर्ज वितरण केले.
सदर कर्जामुळे बँकेस एक चांगले कर्जदार मिळालेचे सांगून प्रशासक कोतमिरे यांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी परिसरातील उद्योजक व बँकेचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here