आरोग्यकरमाळासोलापूर जिल्हा

लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करमाळा पशुवैद्यकीय विभागाने गावोगावी जलद सर्वेक्षण करणे गरजेचे; जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करमाळा पशुवैद्यकीय विभागाने गावोगावी जलद सर्वेक्षण करणे गरजेचे; जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन

करमाळा (प्रतिनिधी); लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने तत्परतेने सर्वेक्षण व उपचार करुन करमाळा मतदार संघातील गोधन वाचवावे, अशी मागणी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील यांनी सांगितले की सध्या लम्पी आजाराचा प्रादुर्भाव सर्वत्र असून करमाळा मतदार संघातही अनेक गावात या आजाराची लागण झालेली जनावरे आढळून येत आहेत.

यामुळे पशुवैद्यकीय विभागाने वेळीच दखल घेऊन उपाययोजनेसाठी तत्परता दाखवून कामाला लागण्याच्या सुचना जिल्हा परिषदेकडून देण्यात याव्यात. 

‘लम्पी स्किन’ या जनावरांच्या आजाराबाबत जिल्हा परिषेदने धोरण ठरवून पशुवैद्यकीय विभागाचे फिरते दवाखाने जिल्ह्यात व करमाळा मतदार संघात मोठ्या संख्येने कार्यरत करावेत व फिरत्या दवाखान्यांच्या मदतीने चार तासांच्या आत नमुना संकलन केले जावे तरच या संसर्गजन्य आजारास आळा घालता येईल.

करमाळा मतदार संघातही शेतकरी मोठ्या प्रमाणावर दुध उत्पादन करत असुन यासाठी जनावरे पाळून आहेत. दुध संकलनही मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतू लम्पी आजारामूळे यावर परिणाम होऊन शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात जाऊ लागला आहे.

गाय व म्हशी सारख्या दुभत्या जनावराची बाजारात मोठी किंमत असून लाखो रुपये मोजून हे गोधन शेतकरी जोपासत असल्याने आता लम्पी आजाराने याचा फटका थेट शेतकऱ्याला बसायला लागला आहे.

या आजारांच्या लक्षणांविषयी दुग्धशाळा, दूध उत्पादक संघ, दुध संकलन संस्था, ग्रामपंचायती आणि पशुवैद्यकीय दवाखान्यांद्वारे जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात यावा. लागण झालेली संशयित जनावरे ओळखण्यासाठी खासगी पशुवैद्यकीय चिकित्सकांच्या बाह्यरुग्ण विभागात निरीक्षण केले जावे आणि जनावरांची जीवित हानी टाळण्यासाठी प्रभावी उपचार केले जावेत.

अतिरिक्त सरकारी डॉक्टर आणि पशुधन पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात येऊन गावोगाव तातडीने सर्वेक्षण केले जावे अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी या निवेदनातून केली.

तसेच शेतकर्‍यांनीही जनावरांचं प्रतिबंधात्मक लसीकरण,गोठ्यांची स्वचछता ,गायी म्हशी स्वतंत्र बांधाव्यात,डॉक्टरांशी संपर्क साधावा व बाधित जनावरांसाठी स्वतंत्र्य व्यवस्था ठेवावी असे आवाहन सुद्धा मा. आ. पाटील यांनी केले. 

 

litsbros

Comment here