करमाळाक्राइमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापूरातील ‘त्या’ सराईत गुन्हेगाराला अटक करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन; करमाळा तहसीलदार यांना रिपाइं (आठवले) गटाचे निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापूरातील ‘त्या’ सराईत गुन्हेगाराला अटक करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन; करमाळा तहसीलदार यांना रिपाइं (आठवले) गटाचे निवेदन

करमाळा(प्रतिनिधी); रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वतीने करमाळा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, दिनांक 28/11/2022 रोजी आमचे नेते उत्तम भैया नवघरे यांची शेत जमीन हडप करण्याच्या हेतूने प्रकाश वानकर व त्यांच्या टोळीने उत्तम भैया नवघरे यांचे वर प्राणघात खाल्ला केलेला होता.

उत्तम भैया नवघरे यांना शारीरिक अपंगत्व असल्याचे सदर गुन्हे मध्ये अपंग व्यक्तीस जबर मारहाण करणे दलितांची जमीन हडप करणे राजरोसपणे रिवाल्वर दाखवून जिवे मारण्याचा प्रयत्न करणेमारहाणकरणे अशा प्रकारचा जीव घेणा प्रकार प्रकाश वाडकर व त्यांच्या टोळीने केलेला होता.

त्याबाबत श्री उत्तम भैया नवघरे याने सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला होता तथापि पूर्वी पोलिसांनी केवळ किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला होता. तथापि आमचे काही प्रतिष्ठित लोकांनी पोलीस स्टेशनला जाब विचारले नंतर फक्त दलित व्यक्तीशी जातीवाचक शिवीगाळ करणेबाबतचे कलम लावून ॲट्रॉसिटी ची वाढ केलेली आहे.

तथापि सदर फिर्याद पाहता यामध्ये दलित व्यक्तीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करणे यानुसार ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम 4 फ नुसार कलम दाखल करणे आवश्यक होते तसेच उत्तम भैया नवघरे हे शारीरिक अपंग असल्याने अपंग व्यक्तीस जबरी मारहाण करणेबाबत अपंग व्यक्तीचे संरक्षण कायद्यानुसार कलम दाखल करणे तसेच फिर्यादीमध्ये रिवाल्वर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यानुसार आर्म ॲक्टचे लावणे आवश्यक होते व अपंग व्यक्ती जबरी मारहाण करणे यानुसार भा.द.वि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्याचे हेतूने केवळ किरकोळ स्वरूपाची कलमी लावलेले आहेत.

तसेच गुन्हा घडवून तब्बल एक महिना झाला तरी आरोपी हे मोकाट असून त्यांना अटक देखील केलेली नाही सदर आरोपी हे अद्याप शहरातच राहून इतर व्यक्तींना आम्ही कायद्यापेक्षा कसे श्रेष्ठ आहोत असे दाखवून समाजामध्ये दहशत पसरविण्याचे काम करीत आहेत.

तरी दिनांक 27/12/20122 परयंत सराईत गुन्हेगार प्रकाश वानकर गणेश वानकर दत्ता वानकर व विठ्ठल वानकर यांच्यावर व त्यांच्या टोळीवर वरील प्रमाणे गुन्ह्याचे कलम दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी व त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अन्यथा दिनांक 28/12/2022 रोजी जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालया सोलापूर यांचे समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी प्रसेनजीत कांबळे रंजीत कांबळे बुद्धभूषण घोडके आदित्य घोडके शुभम कांबळे राजरत्न कांबळे विजय बापू वाघमारे जमील शेख आनंद कटारे विजय कांबळे ओम कांबळे स्वप्निल कांबळे स्वप्नील करण धाकतोडे सुरज गायकवाड करण खरात आदी जण उपस्थित होते.

litsbros

Comment here