करमाळासोलापूर जिल्हा

उदया सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येणार; कारखानदारां समोर उभ करणार एकीचे बळ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उदया सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येणार; कारखानदारां समोर उभ करणार एकीचे बळ

करमाळा (प्रतिनिधी) ; ऊस वाहतूक दरवाढ व एक रकमी एफ आर पी देण्याबाबतच्या प्रश्नासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बुधवार दि. १३ ऑक्टोबर रोजी टेम्भूर्णी येथे विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना व शेतकऱ्यांच्या मागणीस पाठिंबा देणारे राजकीय पक्ष यांची एकत्र बैठक आयोजित करण्यात आली आहे .

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चालू गळीत हंगाम काही दिवसावर येऊन ठेपला आहे परंतु कोणताही साखर कारखानदार ऊस वाहतूक दरवाढ व एक रकमी एफ आर पी देण्याबाबत काहीही बोलण्यास तयार नाही.

या प्रश्नाबाबत विविध शेतकरी संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. परंतु साखरसम्राटांवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. या प्रश्नास वाचा फोडण्यासाठी आता वेगवेगळी आंदोलने न करता एकत्रित लढा देणे गरजेचे आहे.

कोणा एकाच्या नेतृत्वाखाली हा लढा न देता सामुदायिक नेतृत्वाखाली पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. याच संदर्भात दि. १३ रोजी सकाळी ११ वाजता टेंभुर्णी येथील शिवगौरी संकल्प येथे बैठक आयोजित केली आहे .


या बैठकीस ज्यांना ऊस उत्पादक शेतकरी व ऊस वाहतूकदार यांच्यासाठी काही ठोस काम करावयाचे आहे अशा सर्व शेतकरी संघटना, सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अतुल खुपसे पाटिल यानी केले आहे करण्यात आले आहे.

litsbros

Comment here