आरोग्यकरमाळामहाराष्ट्रसोलापूर जिल्हासोलापूर शहर

हार्ट अटॅकची भीती? आता स्वतःचा ईसीजी घरच्या घरीच काढा ; सोलापूरचे डॉ. गुरुनाथ परळे यांच्या स्टार्ट अपला केंद्र सरकारची पन्नास लाख रुपयांची ग्रॅंट

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

हार्ट अटॅकची भीती? आता स्वतःचा ईसीजी घरच्या घरीच काढा ; सोलापूरचे डॉ. गुरुनाथ परळे यांच्या स्टार्ट अपला केंद्र सरकारची पन्नास लाख रुपयांची ग्रॅंट

सोलापूर : हार्ट अटॅक मुळे ६० टक्के मृत्यू हे पहिल्या तासात होतात. तसेच तीव्रस्वरूपाच्या हार्ट अटॅक मध्ये ट्रीटमेंट चा जास्तीत जास्त फायदा हा पहिल्या काही तासातच होतो. म्हणून मृत्यूचे प्रमाण कमी करता येते. किंवा हृदयाचे नुकसान कमी करता येते. दुर्दैवाने भारतामध्ये हार्ट अटॅक चे निदान उशीरा होते.

त्यामुळे बरेच रुग्ण हॉस्पिटलमध्ये जायच्या आधीच मृत्युमुखी पडतात, किंवा योग्य ती ट्रीटमेन्ट किंवा अँजिओप्लास्टी किंवा थ्रोम्बोलीटीक ट्रीटमेंट पासून वंचित राह्तात. येथील हार्ट अटॅक चे निदान उशिरा होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे म्हणजे ईसीजी मशीनची सोय नसते. किंवा इंटरप्रिटेशन ची सोय नसते.

विशेषतः खेड्यात व दुर्गम भागात ही समस्या जास्त गंभीर असते. हृदयरोग तज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांनी आपल्या ३० वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये हे वारंवार अनुभवले म्हणून त्यांनी विचार केला कि जर ईसीजी कोणत्याही व्यक्तीचा घरीच काढता आला तर ?


त्यांच्या ह्या कल्पनेला श्री प्रशांत सदावर्ते आणि श्री श्रीराम कुलकर्णी यांनी साथ दिली आणि स्टार्ट अप कंपनी “हेयान हेल्थ सोल्युशन्स” चा जन्म झाला. या तिघांनी मिळून असे एक प्राथमिक उपकरण तयार केले. ज्याच्या मागची कल्पना अशी होती की एक विशिष्ट जॅकेट रुग्णाने घालायचे आणि त्याच्यावरील एक बटन दाबले की ईसीजी काढला जाईल आणि नंतर तोच मोबाईलवरील ऍप द्वारा हव्या त्या डॉक्टरांच्या मोबाईलवर डायग्नोसिससाठी पाठवला जाईल.

या त्यांच्या कल्पनेला केंद्र सरकारच्या BIRAC यासमितीने पन्नास लाखरुपयांची ग्रॅण्ट देऊ केली आहे. ज्याद्वारे हे उपकरण व्यावसायिक दृष्ट्या निर्माण करून बाजारात आणण्यास मदत होईल.
सध्या असलेले I Watch सारखे प्रॉडक्ट्स हे फक्त हृदयाचे ठोके मोजणे किंवा अनियमितता दाखवणे एवढ्यापुरतेच मर्यादित आहेत.

हार्ट अटॅकचे निदान करण्यासाठी आवश्यक असणारा १२ LEAD ECG फक्त डॉ. परळेच्या या “दिलासा” या उपकरणाद्वारे शक्य आहे.


थोडक्यात डॉ. परळे यांचे हे ‘दिलासा’उपकरण हे हृदयरुग्णांसाठी दिलासादायक ठरणारे आहे यात शंका नाही. त्यांच्या या उपक्रमासाठी स्पंदन ह्या त्यांच्या कन्सल्टींगमधील स्टाफ , हाऊसमन, अश्विनी रुग्णालयातील हृदयरोग विभागातील स्टाफ यांची मोलाची मदत मिळाली. त्यांच्या या संशोधनाबद्दल अश्विनी रुग्णालयाचे चेअरमन बिपिनभाई पटेल यांनी त्यांचे अभिनंदन केले.

litsbros

Comment here