सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर वीस नव्या सदस्यांची निवड; भाजप 14 तर शिंदे सेनेच्या सहा जणांना संधी, करमाळा तालुक्यातील ‘या’ दोघांचा समावेश
सोलापूर, दि.10- जिल्हा नियोजन समितीवर वीस सदस्यांच्या नव्याने निवडी करण्यात आल्या आहेत. या निवडीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
यात 6 सदस्य शिंदे गटाचे असून इतर 14 भाजपचे सदस्य आहेत. सोलापूर शहरातून अमोल शिंदे व उमेश गायकवाड यांना शिंदे गटाने संधी दिली आहे. जिल्हा नियोजन समितीची सभा येत्या शुक्रवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर या सदस्यांच्या निवडी झाल्या असून त्यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार समाधान आवताडे (दोघेही भाजप) यांना संधी देण्यात आली आहे. जिल्हा नियोजनशी संबंधित ज्ञात असलेल्या समितीमधून जिल्हा परिषदेचे माजी सभागृह नेते अण्णाराव बाराचारे (कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), शिवाजी सावंत (शिंदे गट, वाकाव, ता. माढा), धैर्यशील मोहिते पाटील (भाजप, अकलूज, ता. माळशिरस), माजी आमदार प्रशांत परिचारक (भाजप, पंढरपूर) यांना संधी देण्यात आली आहे.
विशेष निमंत्रित सदस्य म्हणून चनगोंडा हावनाळे (बरुर, ता. दक्षिण सोलापूर), चेतनसिंह केदार (सांगोला भाजप), गणेश चिवटे (करमाळा भाजप), योगेश बोबडे (टेंभुर्णी, ता. माढा), केशवराव पाटील (निमगाव, ता. माळशिरस), सुनील चव्हाण (टाकळी सिकंदर, ता. मोहोळ), प्रदीप खांडेकर (भाजप, हिवरगाव, ता. मंगळवेढा), रफिक नदाफ (सांगोला), उमेश गायकवाड (सलगरवाडी सोलापूर), विजय गरड (पांगरी, ता. बार्शी), नारायण पाटील (जेऊर, ता. करमाळा, शिंदे गट), अमोल शिंदे (उत्तर कसबा, सोलापूर शिंदे गट), नागेश भोगडे(उत्तर कसबा, सोलापूर), अशोक दुस्सा (न्यू,पाच्छापेठ, सोलापूर) यांची निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडीची सत्ता असताना पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे होते.
त्यावेळी झालेल्या निवडी नंतर सरकार बदलल्यावर रद्द झाल्या. त्यामुळे आता या नवीन 20 सदस्यांना जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.
Comment here