धक्कादायक बातमी; करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात कोरोनाने फक्त 15 दिवसात झाला 20 जणांचा मृत्यू
केतूर (अभय माने) करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजविला असून, मृत्यूचे प्रमाण वाढत आहे तालुक्याच्या पश्चिम भागातील सोगाव येथे गेल्या पंधरा दिवसात वीस कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
गावामध्ये कोरोना बाधित मृत्यूचे प्रमाण वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे परंतु शासकीय पातळीवर मात्र याबाबत ‘ सारे काही आलबेल’ असल्याचे चित्र आहे.
.. म्हणून सकाळी दफन केलेला मृतदेह सायंकाळी काढावा लागला उकरुन
करमाळा तालुक्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग आला असला तरी लशीच्या तुटवड्यामुळे अनेक आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांना लसीविना माघारी फिरावे लागत आहे. लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत असल्याने सोशल डिस्टंसिंग आवडत आहे प्रतिबंधक लसीकरण त्यामुळे होत आहे.
सोगाव येथे लसीकरण करण्यात यावे अशी मागणी सरपंच पुष्पलता गोडगे यांनी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांना निवेदनाद्वारे केली होती परंतु अद्यापपर्यंत गावांमध्ये लसीकरण झालेले नाही,गावामधील ८० टक्के गावकरी कोरोनाच्या भितीमुळे गाव सोडून गावाबाहेर वाड्या वस्त्यावर शेतामध्ये आपला बाडबिस्तरा घेऊन राहावयास गेले आहेत.
ही बातमी तुम्ही घाबरावं म्हणून नाही तर, अधिक काळजी घ्यावी, लॉकडाऊन पाळून सुरक्षित राहावं आणि लसीकरणाल साथ द्यावी . यासाठी आम्ही तालुक्यातील वस्तुस्थिती सांगत आहोत.
काळजी घ्या, वेळेवर जागृत व्हा, सुरक्षित राहा.
– करमाळा माढा न्यूज
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मध्ये तरुणांचा भरणा अधिक असल्याने हळहळ व चिंता व्यक्त केली जात आहे.
Comment here