करमाळा तालुक्यातील सोगाव पश्चिम येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
केत्तूर (रवी चव्हाण) ; सोगाव पश्चिम ता. करमाळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भिमरत्न तरून मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातील प्रमुख मार्गाने सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.
त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ कामगार आघाडीचे पच्छिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.यशवंतभाऊ गायकवाड यांनी भेट दिली असता त्यांचा सत्कार रि प ई आ सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष मा.सतीश भोसले यांनी केला.
त्यावेळी सत्कार स्विकारताना व महामानवाच्या प्रतीमांना अभिवादन करताना मा.यशवंतभाऊ गायकवाड, सोबत सोगावचे मा.सतीश भोसले, हरिश्चंद्र भोसले,अनिल भोसले,विशाल भोसले,प्रविण भोसले, नितीन भोसले,बापू (गुरुजी) भोसले,
भागवत भोसले, सुभाष भोसले,लक्ष्मण भोसले,दादा भोसले,हर्षद भोसले,लहू भोसले,करण भोसले,दयानंद भोसले,विक्रम भोसले ,शंकर गायकवाड,अदिरत्न शेलार व शेकडो भिमानुयायी स्त्री-पुरुष व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comment here