करमाळा

करमाळा तालुक्यातील सीना कोळेगाव धरण अखेर 100% भरले; पूर्व भागातील शेतकरी सुखावला

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील सीना कोळेगाव धरण अखेर 100% भरले; पूर्व भागातील शेतकरी सुखावला

करमाळा (प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील वरदायिनी ठरणाऱ्या सीना कोळेगाव प्रकल्प आज पूर्णतः क्षमतेने म्हणजे शंभर टक्के भरले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील परिसरात सततच्या होत असणाऱ्या पावसामुळे सीना कोळेगाव प्रकल्प 100% भरले आहे सीना कोळेगाव प्रकल्प 100% भरल्याने प्रकल्प परिसरातील शेतकरी वर्गांमधून आनंद व्यक्त होत असताना दिसत आहे.

सदरचा पूर्व भागातील सीना कोळेगाव चा प्रकल्प हा करमाळा व परंडा तालुक्यातील भागातील शेतकऱ्यांना मोठ्या फायद्याचा ठरत आहे या प्रकल्पामुळे करमाळा व परंडा तालुक्यातील अनेक जमिनी सिंचनाखाली येत असल्याने सदरचा प्रकल्प प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वर्षी 100% भरल्याने शेतकरी वर्गांमधून आनंद व्यक्त होताना दिसत आहे.

उस्मानाबाद सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या या कोलेगाव प्रकल्पामुळे परंडा तालुक्यातील आर्थिक गणिते याच प्रकल्पावर अवलंबून असल्यामुळे तसेच यंदाच्या वर्षीही सदरचा कोळेगाव प्रकल्प 100% भरल्याने परांडा शहरातील आर्थिक उलाढालीला मोठे हातभार लागणार आहे.

litsbros

Comment here