सिना कोळगाव प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नी मंत्रालयात बैठक…
केतूर ( अभय माने ) करमाळा तालुक्यातील सिना कोळगाव प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंबधी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नागपुर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करुन गेल्या 27 वर्षापासुन रखडलेल्या प्रश्नावरती आवाज उठवला होता त्यावर सरकाच्या वतीने सभागृहात उत्तर देताना मंत्री शंभुराज देसाई यांनी या प्रश्नी मार्ग काढण्यासाठी हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रालयात बैठक आयोजित करण्याचे अश्वासन दिले होते त्यानुसार सोमवार 23/1/23 रोजी बैठक आयोजित करण्यात आल्याचे पत्रक शासनाने काढले आहे.
सिना कोळगाव धरणासाठी करमाळा तालुक्यातील,कोळगाव,निमगाव,हिवरे,आवाटी,भालेवाडी,मिरगव्हाण,गौंडरे या गावातील जवळपास 732 शेतकर्यांना अजुनही पर्यायी जमिनी वा मोबदला मिळालेला नाही.
त्यासाठी पुनर्वसन कायद्यातील काही तांत्रिक बाबींवर मार्ग काढण्याची गरज असुन या बैठकीत तो मार्ग निघेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
Comment here