करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात ऊस गाळप हंगाम संथगतीने: ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात ऊस गाळप हंगाम संथगतीने: ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

केत्तूर (अभय माने ) ऊस गळीत हंगाम सुरू होऊन 25 दिवसाचा कालावधी झाला तरी अद्यापही ऊस गाळप हंगाम अडखळतच सुरू असल्याचे चित्र आहे.

सध्या तरी करमाळा तालुक्यातील बारामती ऍग्रो, अंबालिका शुगर , कमलाई शुगर, मकाई सहकारी या कारखान्याच्या गळीत हंगाम सुरू झाला असला तरी हंगाम गतीने सुरू होण्यास आणखी पंधरा दिवस ते एक महिना लागेल असेच दिसत आहे.

अगोदरच एक ऑक्टोबरला सुरू होणारा ऊस गाळप हंगाम शासनाने 15 ऑक्टोबरला सुरू करण्यास परवानगी दिली परंतु परतीच्या पावसाने यालाही ब्रेक लावण्याची काम केले.

दरम्यान एफआरपीची मागणी, उसाचे मोठे उत्पादन, सक्षम तोडणी यंत्रणा यासाठी कारखानदाराची मोठी दमचक होणार आहे.परतीच्या पावसाने लांबलेला गळीत हंगाम शेतकऱ्यांना मात्र तोट्याचा ठरणार आहे.

सहज येणारे पीक म्हणून मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते याच साखर धंद्यातून शेतकऱ्यांना लाभ होतो व दोन पैसे येतात.

त्यामुळे त्यांचाही आर्थिक स्थिती सुधारते गेल्या दोन वर्षापासून साखर उद्योगालाही उतरती कळा लागले हे असेच दिसते साखरेचे अतिरिक्त उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारभाव यामुळे साखर उद्योग आर्थिक संकट जात आहे .

litsbros

Comment here