करमाळासोलापूर जिल्हा

युवासेना जिल्हा प्रमुख सचिन बागल यांनी आई कमलाभवानी चरणी घातले ‘हे’ साकडे ; भगवा सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

युवासेना जिल्हा प्रमुख सचिन बागल यांनी आई कमलाभवानी चरणी घातले ‘हे’ साकडे ; भगवा सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम

केतूर (अभय माने) शिवसेना वर्धापनदिनानिमित्त व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते राहुल कानगुडे यांच्या नेतृत्वाखालील भगवा सप्ताह कार्यक्रम सुरु असून आज वर्धापनदिनानिमित्त युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन बागल यांच्या हस्ते कमलाभवानी मातेस महाआरती करण्यात आली. तसेच कमलाभवानी मतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुदादा फरतडे, तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड, शहर प्रमुख प्रवीण कटारीया, महिला आघाडी तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड, माजी तालुका प्रमुख वर्षाताई चव्हाण, केम शहर महिला आघाडी प्रमुख आशाताई मोरे, उपतालुका प्रमुख श्रीहरी तळेकर, प्रमोद वागज, बंडू शिंदे, भिवाजी शेजाळ,

गौंडरेचे माजी उपसरपंच शाखा प्रमुख उत्तम हनपुडे, आळसुंदेचे माजी उपसरपंच जोतीराम घाडगे, युवासेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, समाधान फरतडे, भाऊ मस्तुद, दिगंबर काटुळे, बाळासाहेब शिंदे, बिरू ठोंबरे, अभिमन्यू लोकरे उपस्थित होते.

महिला आघाडीने यावेळी कमलाभवानीची खणनारळाने ओटी भरली यावेळी आई कमलाभवानीची ओटी महिला आघाडीच्या तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड, माजी तालुका प्रमुख वर्षा चव्हाण, आशाताई मोरे यांच्या हस्ते भरण्यात आली.

litsbros

Comment here