आरोग्यकरमाळासोलापूर जिल्हा

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मार्फत करमाळा तालुक्यात वारकऱ्यांना मोफत औषधांचे वाटप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मार्फत करमाळा तालुक्यात वारकऱ्यांना मोफत औषधांचे वाटप

करमाळा(प्रतिनिधी) ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मार्फत करमाळा तालुक्यातील शेलगाव (वांगी) येथून जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मार्फत मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या आजारावर चालणारे औषध यावेळी देण्यात आले. गुडघेदुखी, कंबरदुखी, सर्दी – खोकला, अंगदुखी, खुजली मलम, मास्क, पित्त यावरील गोळ्या आणि औषधांचे वाटप करण्यात आले.

तसेच रक्तवाढीसाठी लागणाऱ्या गोळ्या आणि पोट बिघडल्यावर लागणारे विनोचे वाटप यावेळी करण्यात आले. हे शिबिर श्रीकांत सानप आणि गणेश चव्हाण यांनी राबविले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महेशजी चिवटे, आणि नारायण आबा पाटील मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

litsbros

Comment here