Uncategorized

आम्ही छत्रपतीचा अवमान कदापी सहन करणार नाही; जोपर्यंत राज्यपाल व त्रिवेंदी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आम्ही छत्रपतीचा अवमान कदापी सहन करणार नाही; जोपर्यंत राज्यपाल व त्रिवेंदी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत..

करमाळा (प्रतिनिधी); आम्ही छत्रपतीचा अवमान सहन करणार नाही जोपर्यंत राज्यपाल त्रिवेंदी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालु राहणार असल्याचे शिवभक्त पै.सुनील सावंत यांनी सांगितले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सुंधाशु त्रिवेदी यांनी महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करून बेताल वक्तव्य केले आहे.

या गोष्टीचा निषेध करुन राज्यपाल कोश्यारी त्रिवेंदीचे पुतळा दहन केले.लोकशाहीत आतापर्यत हे चालत आले आहे काॅंग्रेस सरकारने याची कधी दडपशाहीचे कारस्थान केले नाही मात्र या शासनाने आम्हा शिवभक्तांवर गुन्हा दाखल करुन शिवभक्तांचा अवमान केला आहे.

अशा गुन्हयाला आम्ही घाबरत नाही आम्ही छत्रपतीचे मावळे असुन जोपर्यत राज्यपाल कोश्यारीं यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानाची त्यांना स्थान दैवत आहेत.

 त्यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा शासन कुठलाही न विचार करता ती अशी काही बोलले नाहीत अशी सारवा सारव केली जात असून छत्रपती शिवाजी महाराज ची प्रतिमा म्हणून करण्याचे काम भाजप सरकार शिंदे शाखा खांद्यावर बंदूक ठेवून करीत आहेत.

मागे बाबासाहेब पुरंदरे च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्यात आली याबाबत भाजपा नेत्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही उलट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन पुरंदरेचा गौरव केला असे वागणारे नाटकी भाजपवाले संघ वाले छत्रपती शिवाजी महाराजाच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा साधा निषेधही करत नाहीत.

 

त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेण्यात आला आहे असे बोलून बुद्धीबिर निर्माण करण्याची काम करत आहे प्रशासनाला हाताशी धरून आमच्यावर व शिवभक्तावर गुन्हे दाखल करून लोकशाहीची गळचेपी करण्याचे काम भाजप सरकार करत असून हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत नसणारे नसून पेशवाई व मोगलशाहीचे पुरस्कार करणारे सरकार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मलीन करून पेशवाई पुढे आणण्याचा घाट भाजपवाले करत आहेत जनता याबाबत चाणक्य आहेत निवडणुकीत नक्कीच ते तुम्हाला धडा शिकवणार आहेत पण छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या नावाखाली माताचा जोगवा मागणारे भाजप शिवसेने वाले यांचा खरा चेहरा समोर आल्याशिवाय राहणार नाही.

 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून काढले नाही सुधांशू त्रिवेदी वर कारवाई केली नाही तर येत्या काळात भाजप सरकारला याची किंमत मोजावी लागेल व छत्रपतीच्या नावाने राजकारण करणाऱ्या या लोकांचा बुरखा पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही व जनता भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही असे मत शिवभक्त सुनील सावंत यांनी व्यक्त केले आहे.

litsbros

Comment here