यंदाचा ऊस गाळप हंगाम ‘या’ कारणामुळे लांबण्याची शक्यता
केतूर ( अभय माने ) परतीच्या पावसाने ऊस पट्ट्यात अक्षरशः धुमाकूळ घातल्याने राज्यातील साखर कारखान्यांना ऊस गाळप हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होणार होता हंगाम सुरू होण्याच्या दृष्टीने साखर कारखान्याची तयारी सुरू आहे. बहुतांश साखर कारखान्यांचे बॉयलर प्रदीपन समारंभ पार पडत आहेत.
परंतु गेल्या दहा-बारा दिवसापासून पाऊस होत असल्याने उसाच्या शेतात पाणी साचल्याने ऊसतोड मजुरांना ऊसतोड करता येणार नसल्याने गळीत हंगाम लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कारखाना स्थळावर जिल्ह्यातून ऊस तोड मजूर दाखल होत आहेत तर काही ठिकाणी बहुतांश मजूर दाखलही झाले आहेत या मजुरांना होणाऱ्या पावसाचा मात्र जोरदार फटका बसत आहे. त्यातच हवामान खात्याने आणखी मुसळधार पावसाचे संकेत दिले आहेत.
परतीचा पाऊस दररोज हजेरी लावत असल्याने तोडणीस आलेल्या ऊसाला उशीर होत आहे तर आडसाली उसाच्या लागणीवरही परिणाम होणार आहे.
हेही वाचा- कोरोनाने कुटुंबप्रमुख गेलेल्या शेटफळ येथील कुटुंबाला ‘जगदीशब्द फाउंडेशन’चा आधार
रोज पाऊस होत असला तरी ” ऑक्टोंबर हिट ” ची उष्णता जोरदारपणे वाढत असल्याने उकाड्याने नागरिक मात्र हैराण होत आहेत.
Comment here