करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

करमाळा शहरातील इस्लाम मोहल्ला यंग ग्रुपच्या वतीने शहीद टिपू सुलतान जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरातील इस्लाम मोहल्ला यंग ग्रुपच्या वतीने शहीद टिपू सुलतान जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी

करमाळा (प्रतिनिधी-अलीम शेख); शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त करमाळा येथील इस्लाम मोहल्ला यंग ग्रुप च्या वतीने आज उर्दू शाळा येथे उर्दू शाळेतील विद्यार्थिनींना वह्या पेन तसेच खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे नगरसेवक संजय सावंत अर्बन बँकेचे माजी संचालक फारुक जमादार राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख संतोष वारे युवा उद्योगपती अमीर शेठ तांबोळी गणेश सावंत खलील मुलांनी सलीम भाऊसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते

 यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक फारूक बेग यांनी केले उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचे इस्लाम मोहल्ला ग्ग्रुपच्या वतीने यथोचित पुष्पगुच्छ तसेच शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी करमाळा येथील इस्लाम मोहल्ला यंग ग्रुपचे फारूक बेग, अलीम पठाण, अकबर बेग, सद्दाम शेख, आयन बेग, समीर शेख ,सद्दाम शेख, फिरोज पठाण, अरबाज बेग, नदीम शेख , शाहिद बेग, पैलवान समीर शेख, शाहरुख शेख, साबीर शेख, सरफराज शेख, मुजाहिद सय्यद,

कमैनुद्दीन शेख, असीम बेग, आसिफ बेग, मोसिन पठाण, मुस्ताक दारुवाले, शोएब बेग, अल्ताफ दारवाले, जमीर मुलानी, आसिफ जमादार, शाहरुख मुलानी, अमन शेख आदींनी परिश्रम घेतले.

याशिवाय इस्लाम मोहल्ला यंग ग्रुपच्या वतीने देवीचा माळ येथील मूकबधिर शाळेमध्ये खाऊ वाटप तसेच नालबंद नगर येथील मदरसा येथे स्वेटर चे वाटप करणार असल्याची माहिती मुस्लिम मोहल्ला यंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष फारुख बेग यांनी बोलताना माहिती दिली.


एकंदर पाहता शहीद टिपू सुलतान जयंती निमित्त करमाळा शहरातील मुस्लिम मोहल्ला यंग ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती मुस्लिम यंग ग्रुपच्या वतीने देण्यात आली.

litsbros

Comment here