आरोग्यकरमाळा

करमाळा शहरातील ‘या’ प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे ऑडिट करावे; आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार व चौकशीची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरातील ‘या’ प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे ऑडिट करावे; आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार व चौकशीची मागणी

करमाळा येथील जवळेकर हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाईची मागणी

करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा जि सोलापूर येथील जवळेकर हाॅस्पिटमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन न करता कोरोनावर चुकिच्या पद्धतीने उपचार करण्यात येत असल्यामुळे मोठ्याप्रमाणावर रुग्णांच्या होत असलेल्या मृत्यूंचे ऑडीट होऊन सदर सेंटर व डाॅक्टरांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सुधाकर शिंदे, जिल्हाधिकारी, सोलापूर तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर यांच्याकडे मानवी हक्क कार्यकर्ते ॲड. विकास शिंदे यांनी केली आहे.

सदर तक्रारीत म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. अनेकांचे यामध्ये जीव जात आहे. सहज उपचार मिळावेत म्हणून खाजगी हाॅस्पिटल्सला सरकारने कोविड सेंटर उभारण्याची परवानगी दिलेली आहे.

करमाळा माढा न्युजला जाहिरात म्हणजे तुफान प्रसिद्धी ; संपर्क 7058592990

कोरोना रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार करण्यात यावेत याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जागतिक आरोग्य संघटना तसेच भारतीय वैद्यकीय परिषद यांनी देशातील सर्व डॉक्टरांना दिलेल्या आहेत. त्यानुसारच कोरोना पेशंट वरती उपचार होणे अपेक्षित आहे. मात्र करमाळा शहरात परवानगी देण्यात आलेल्या जवळेकर हॉस्पिटलच्या कोरोना सेंटरमध्ये या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नाही.

मनमानी व चुकीच्या पद्धतीने रुग्णांवरती उपचार केले जात असल्यामुळे अनेक रुग्णांचे जीव जात आहेत. या भागातील इतर रुग्णालयांपेक्षा या रुग्णालयाचा मृत्यू दर खुप जास्त आहे. त्याचे कारण चुकीच्या पद्धतीने उपचार, गरज नसताना रेमिडीसीवर चा भडीमार हे आहे. 90 पर्यंत ऑक्सिजन लेवल असलेल्या रुग्णाला रेमेडीसिवर इंजेक्शन देण्याची आवश्यकता नसतानाही पाच ते सहा इंजेक्शन दिली जात आहेत. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्ण बरा होण्यापेक्षा इंजेक्शनचे रुग्णांवर होणारे घातक परिणाम जास्त भयंकर आहेत. अगदी कमी प्रमाणात त्रास असणाऱ्या पेशंटला जीव गमवावे लागले आहेत.

हेही वाचा- धक्कादायक बातमी; करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात कोरोनाने फक्त 15 दिवसात झाला 20 जणांचा मृत्यू

करमाळा तालुक्यातील कोर्टी गावात ‘हे’ ४ दिवस होणार कोरोना लसीकरण, पूर्व नोंदणी असणार अनिवार्य

उपचार सुरू असताना डॉक्टर किंवा हॉस्पिटलने नातेवाईकांसोबत उपचाराबाबत पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे. मात्र रुग्णांना त्यांची उपचाराची फाईल देखील दाखवली जात नाही. तसेच काही विचारणा केल्यास चिडून किंवा उडवाउडवीची उत्तरे देऊन हाकलून दिले जाते. सदर जवळेकर हॉस्पिटलच्या अंतर्गत असलेल्या कोरोना सेंटर वरती कोणाचाही अंकुश नसल्याचे व त्यामुळे कारण नसताना रेमेडीसीवर व इतर औषधांचे अति डोस देण्यामुळे अनेक रुग्णांचे जीव जात आहेत.

भविष्यात अनेक निष्पाप लोकांचे जीव वाचवायचे असतील तर जवळेकर हॉस्पिटलमध्ये रुग्णांवरती जे उपचार केले जातात त्याची सखोल चौकशी करण्याची तसेच जवळेकर हॉस्पिटल मध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे ऑडिट होणे अत्यंत गरजेचे आहे.

या विषयी करमाळा माढा न्यूजच्या प्रतिनिधीने डॉ संदेश शहा-जवळेकर यांच्याशी संपर्क केला असता, डॉ शहा म्हणाले की जवळेकर हॉस्पिटलच्या कोविड सेंटरची क्षमता 10 असून ही आम्ही जनतेच्या सेवेसाठी व सोयीसाठी 40 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करत आहोत. जास्तीत जास्त रुग्णांना चांगले उपचार देणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही कोणत्याही रुग्णाला गरजेशिवाय कोणतेही इंजेक्शन अथवा औषध देत नाही. आमच्या हॉस्पिटलवर नाहक आरोप केले जात आहेत.

कोविड सेंटरला आगी लागण्याच्या तसेच त्यास जीवीतहानी झाल्याच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या आहेत. सदर कोविड सेंटरचे फायर ऑडिट करण्यात आलेले नाही. सदर ठिकाण हे सगळीकडून बंदिस्त असल्यामुळे दुर्दैवाने आगीची घटना घडून मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतचे कोणतेही नियम न पाहता परवानगी देण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचा- ऑक्सिजनवर विविध संशोधने करणाऱ्या मराठमोळ्या संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू

आमच्या सुनेचे इरफान पठाण सोबत अनैतिक संबंध; या माजी पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपाने क्रीडाक्षेत्रात खळबळ

वरील सर्व बाबी विचारात घेऊन करमाळा येथील जवळेकर हॉस्पिटलच्या कोविंड केअरची तातडीने तपासणी करण्यात यावी तसेच तेथे झालेल्या मृत्यूंचे ऑडिट करून संबंधित हॉस्पिटल वरती कडक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. तक्रारीची योग्य दखल न घेतल्यास लोकांचे जीव वाचविण्यासाठी जनहितार्थ उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही ॲड. शिंदे यांनी दिला आहे.

litsbros

Comment here