करमाळा

सावडीचा सुपुत्र विकीची STI पदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सावडीचा सुपुत्र विकीची STI पदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न

करमाळा(प्रतिनिधी); सावडी ता.करमाळा येथे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या (MPSC) परिक्षेत घवघवीत यश मिळवून राज्य कर निरिक्षक (state lax Inspector) पदासाठी निवड झालेल्या,एक सर्व सामान्य कुटुंबापासून ते राज्य कर निरिक्षक (STI) पदापर्यंत धैर्याने वाटचाल करणाऱ्या मा.विकी महादेव सोनवणे यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ कामगार आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 त्यावेळी बोलताना यशवंत गायकवाड म्हणाले विकीचा सत्कार हा त्याच्या जिध्दीचा चिकाटाचा ,अथक प्रयत्नाचा सत्कार आहे,त्याच्यामुळे समाजातील तरुणांना एक वेगळी प्रेरणा मिळेल, त्यावेळी विकी सोनवणे म्हणाले.

परिस्थीती हालाखीची असताना, समाजातून निगेटिव्ह विचार ऐकायला मिळायचे ,परंतू परिस्थितीचे व निगेटिव्ह विचारसरणीचे भांडवल न करता, १२-१२ तास अभ्यास करून,धेयाच्या दिशेने वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते.

त्यासाठी कुठल्याही विषयाचा कधी बाऊ करायचा नाही, मिळालेल्या संधीच सोनं करून समाज्यातील तरुणांसाठी वेळ देणार असल्याचे प्रतिपादन केले ‌त्यावेळी सौ.गिता गायकवाड, वैजयंता गायकवाड,रेखा व विकी आई भामाबाई उपस्थित होते.

litsbros

Comment here