बेकायदेशीर सावकारी प्रकरणी करमाळा तालुक्यातील दोघांना अटकपूर्व जामीन
उमरड(प्रतिनिधी) – करमाळा पोलीस स्टेशन येथे मच्छिंद्र सिताराम वाघमारे (राहणार आळसुंदे तालुका करमाळा) यांनी आरोपी मुरलीधर पोळ (राहणार शेटफळ तालुका करमाळा) व तुळसाबाई ज्ञानदेव करे (राहणार जेऊर तालुका करमाळा) यांच्याविरुद्ध बेकायदेशीर सावकारी केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
करमाळा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता. सदर प्रकरणी यातील फिर्यादीचे वडिलांनी यातील आरोपी कडून रक्कम घेतलेली होती व सदरची रक्कम यातील फिर्यादीचे वडिलांनी यातील आरोपींना परत केले.
असे असताना त्यावर अवाजवी व्याजाची मागणी केली व त्यास शिवीगाळ व धमकी देऊन त्याला मानसिक त्रास दिला तसेच मुद्दल रक्कम वसूल होऊन सुद्धा वारंवार पैशाची मागणी केल्या बाबतची फिर्याद यातील आरोपी विरोधात दाखल झाली होती.
तद्नंतर यातील आरोपींनी एडवोकेट निखिल पाटील यांचे मार्फत बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामीन मिळणे कामी धाव घेतली होती सदर अर्जाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय श्री ए. बी .भस्मे यांच्यासमोर झाली.
सुनावणी वेळी आरोपींच्या वतीने एडवोकेट निखिल पाटील यांनी सदरचा व्यवहार हा सावकारी स्वरूपाच्या नसून त्यांच्यामध्ये असा कोणताही व्यवहार झालेला नव्हता तसा कोणताही लेखी पुरावा फिर्यादी कडे नसून
याउलट यातील आरोपींनी फिर्यादीचे वडिलांना दिलेले हात उसने पैसे चुकवण्यासाठी सदरची खोटी फिर्याद दाखल केलेली असून यातील आरोपी है चौकशीसाठी तयार असून ते पोलिसांना तपासात सहकार्य करतील असा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींची अटकपूर्व जामिनावर मुक्तता करण्यात आली.
सदर प्रकरणी आरोपीतर्फे एडवोकेट निखिल पाटील एडवोकेट विक्रम सातव व एडवोकेट दत्तप्रसाद मंजरथकर यांनी तर सरकार तर्फे एडवोकेट कदम यांनी काम पाहिले
Comment here