करमाळा

सरपंच निवड जनतेतून झाली, आता तालुक्यात दिग्गजांना प्रतिक्षा उपसरपंच पद निवडीची !

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सरपंच निवड जनतेतून झाली, आता तालुक्यात दिग्गजांना प्रतिक्षा उपसरपंच पद निवडीची !

केत्तूर(अभय माने) नुकत्याच पार पडलेल्या करमाळा तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीसाठीची लढाई पार पडली व धुरळा शांत झाला असला तरी आता उपसरपंचपदाच्या निवडीसाठी मात्र प्रतीक्षा लागली आहे.

गावपुढारी सरपंच थेट जनतेतून निवडला गेल्याने आता उपसरपंच निवड कधी होणार ? यासाठी उत्सुकता असून आपले समर्थक, हितचिंतकांची उपसरपंचपदी वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत परंतु अद्यापही शासनाने या निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत.

काही ठिकाणी पॅनेलला बहुमत ? तर कुठे सरपंच निवडले गेले सदस्य मात्र विरोधी इतर पॅनलचे ? कुठे सदस्य आणि सरपंच नाही. निदान उपसरपंचपद आपल्याकडेच राहावे यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत.

सरपंच निवड थेट जनतेतून झाल्या असल्या तरी, सदस्यामधून उपसरपंचाची निवडणूक होणार असल्याने सदस्य संख्येचे गणित जुळवून आणण्यासाठी पॅनल प्रमुखाकडूनकडून व्यूहरचना आखण्यात येत आहे.तर काही ठिकाणी समझोता करून एक वर्ष किंवा सहा महिन्याला उपसरपंच बदलला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सरपंचपदाच्या निवडी जाहीर झाल्यानंतर तालुका पातळीवरील नेते मंडळींनी आमच्या गटाच्या एवढ्या ग्रामपंचायती तेवढ्या ग्रामपंचायती असे जाहीर करून संपूर्ण तालुकावाशीयांची मात्र करमणुक केली.

litsbros

Comment here