करमाळा

ग्रामपंचायत सरपडोहच्या वतीने दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ग्रामपंचायत सरपडोहच्या वतीने दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न

जिल्हा समाज कल्याण विभाग सोलापूर यांच्या आदेशानुसार व करमाळा तालुका पंचायत समिती चे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मा श्री मनोज राऊत साहेब यांच्या सूचनेनुसार सरपडोह ग्रामपंचायतच्या वतीने आज दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न झाली.

या दिव्यांग कार्यशाळेसाठी करमाळा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री राजकुमार पाटील साहेब, शिक्षणविस्तार अधिकारी श्री नलवडे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी गावातील सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते उपस्थित बांधवांना दिव्यांग निधी बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच ज्या बांधवांकडे दिव्यांग प्रमाणपत्र नाही त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याचे आवाहन करण्यात आले.

उपस्थिती दिव्यांग बांधवांना श्री नाथराव रंदवे उपसरपंच यांनी मार्गदर्शन केले. दिव्यांग 5% निधीतून पात्र लाभार्थी यांना धनादेश चे वाटप करण्यात आले.तसेच गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेनुसार ग्रामपंचायत सरपडोह यांच्या वतीने लहान मुलांना वाफ घेण्याचे यंत्र आशा वर्कर श्रीमती वनिता भिताडे यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी सरपंच सौ मालन पांडुरंग वाळके, उपसरपंच श्री नाथराव रंदवे, ग्रा. सदस्य श्री दत्ता मोरे, ग्रामसेवक श्री आबासाहेब खाडे, पोलिस पाटील श्री अंकूश खरात,आशा वर्कर श्रीमती वनिता भिताडे तसेच दिव्यांग बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

litsbros

Comment here