करमाळासोलापूर जिल्हा

करमाळयात समता परिषदेतर्फे भाजपचे चंद्रकांत पाटील यांचा निषेध

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळयात समता परिषदेतर्फे भाजपचे चंद्रकांत पाटील यांचा निषेध

करमाळा(प्रतिनिधी) ; लय बोलु नका अन्यथा महागात पडेल अशी धमकी देणार्या त्या चंद्रकांत पाटीलांचा अ.भा.महात्मा फुले समता परिषदेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला.

नुकत्याच झालेल्या ४ राज्याच्या निकालानंतर आमचे नेते छगनरावजी भुजबळ यांनी भाजपा वरती टीका केली होती.त्याला उत्तर म्हणुन चंद्रकांत पाटील यांनी मर्यादा सोडुन आपल्या पक्षाच्या खुनशी राजकारणाचा दाखला देत साहेबांना धमकी देऊन तोंड बंद ठेवण्याच काम चं.पा. करत आहेत.

वेगवेगळे आमिष दाखवून पण साहेब आपल्या हाती लागले नाहीत म्हणुन आपण ईडी ची सीडी लावली पण या सगळ्यांना पुरुन उरणारे नेते म्हणजे भुजबळ साहेब होत.

आपल घर सोडुन दुसर्याच्या अंगणात संसार थाटायच अगोदर बंद करा मगच फुकटच्या गप्पा मारा अन् असल्या पोकळ धमक्याला कोणीही घाबरत नाही.

यापुढे जर पाटलांनी आपल तोंड साहेबांच्या विरोधात उघडल तर समता परिषद चं.पा.ला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. असे ठाम मत प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा-धक्कादायक: …म्हणून श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांकडून अदर पूनावाला यांना धमक्या, भारताबाहेर लसीचे उत्पादन करण्याचा विचार

कौतुकास्पद; ‘या’ तालुक्यातील शिक्षकांनी वर्गणी करून उभारले ६० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर

या प्रसंगी समता परिषदेचे अध्यक्ष प्रशांत शिंदे ,शहराध्यक्ष अमोल नाळे , उपाध्यक्ष विशाल बनकर ,सचिव सचिन जाधव, मार्गदर्शक अभंग सर, युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष मयुर यादव,आण्णा शिंदे , लक्ष्मण रासकर ,नागेश रासकर ,
सावता परिषदेचे अध्यक्ष नाना अनारसे ,माळी युवा संघाचे राहुल शिंदे हे उपस्थित होते.

litsbros

Comment here