करमाळाक्राइम

साडे येथील खून प्रकरणातील आरोपीला केले कोर्टात हजर, कोर्टाने दिली ४ दिवसांची पोलीस कोठडी, ‘हे’ होते वादाचे कारण

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

साडे येथील खून प्रकरणातील आरोपीला केले कोर्टात हजर, कोर्टाने दिली ४ दिवसांची पोलीस कोठडी, ‘हे’ होते वादाचे कारण

जेऊर( प्रतिनिधी 🙂 साडे (ता.करमाळा) येथील खून प्रकरणातील संशयित आरोपी प्रकाश लोंढे यास येत्या मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपासणी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक प्रवीण साने यांनी लोंढे यास करमाळा न्यायालयातील न्यायाधीश प्रशांत घोडके यांचे समोर काल (ता.12) हजर करून ७ दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. यात आरोपीतर्फे ॲड. नवनाथ राखुंडे यांनी युक्तिवाद केल्यानंतर आरोपीस चार दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

यात हकीकत अशी की, 10 जून रोजी रात्री 9 च्या सुमारास प्रकाश हणुमंत लोंढे यांचे घरासमोर विष्णु नारायण बनसोडे हे आले होते. त्यावेळी प्रकाश हणुमंत लोंढे याने विष्णु बनसोडे याला तु इकडुन का आला? तुला किती वेळा सांगितले आहे. शाळेकडुन जायचे.

हेही वाचा- दिलासादायक बातमी; भारत सरकार म्हणते ‘या’ वयाच्या बालकांना मास्क लावायची गरज नाही; गाईडलाईन्स जारी

कुगाव येथील महिलेला अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर करमाळा पोलिसात अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

या रस्त्याने यायचे नाही असे म्हणुन, शिवीगाळ सुरू केली व त्यानंतर हाताने तोडांवर बुक्कीने मारून, कमरेत लाथ घातली. त्यानंतर श्री.बनसोडे खाली पडला. नंतर प्रकाश लोंढे याने विष्णु बनसोडे याचे डोके हातात पकडुन सिमेंटच्या रोडवर अपटले. तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर बनसोडे यास करमाळा येथे उपचारासाठी आणले असता, डाॅक्टरांनी मृत घोषित केले.

त्यानंतर अक्षय गायकवाड यांनी फिर्याद दिली.गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळाला भेट दिली व संशयितास तात्काळ अटक केली. पोलीस उपनिरिक्षक श्री. साने यांचेकडे तपास दिला. यात आरोपीतर्फे ॲड.नवनाथ राखुंडे यांनी काम पाहिले आहे.

साने या घटणेचा कसून तपास करत असून या घटनेमागे फिर्यादीत दिलेलेच कारण आहे की दुसरे काही. नेमके वास्तव येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल असे मत श्री. साने यांनी व्यक्त केले.

litsbros

Comment here