करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात रिमझिम पाऊस
केत्तूर ( अभय माने ) दोन-तीन दिवसाच्या उघडपीनंतर केत्तूर (ता.करमाळा) परिसरात मंगळवार (ता. 26) रोजी सकाळी सकाळी पुन्हा एकदा रिमझिम / भुरभुर पावसाने हजेरी लावली.
अधून मधून येणाऱ्या भुरभुर / रिमझिम पावसाचा पावसामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत. सकाळपासूनच रिमझिम / भुरभुर पाऊस सुरू झाल्याने दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.
वारंवार पडणाऱ्या रिमझिम भुरभुर पावसामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी आदि संसर्गजन्य आजाराने नागरिक ग्रासले आहेत.पावसामुळे शेती कामांनाही ब्रेक लागत आहे.
Comment here