करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील ‘या’ आठ ग्रामपंचायतींसाठी आज शांततेत झाले मतदान; निकालाची सर्वाना उत्सुकता

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील ‘या’ आठ ग्रामपंचायतींसाठी आज शांततेत झाले मतदान; निकालाची सर्वाना उत्सुकता

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीसाठी अत्यंत चुरशीने व शांततेच्या वातावरणात मतदान झाले असल्याची माहिती तहसीलदार समीर माने यांनी बोलताना दिली
शुक्रवारी (ता. ५) या मतदानाचा निकाल असून कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी या निवडणुका लढवल्या आहेत.

यामध्ये चार गामपंचायतींसाठी पहिल्यांदाच मतदान झाले आहे. १४ हजार ४६ मतदारांपैकी १२ हजार १२१ मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये वांगी 1 ग्रामपंचायतीसाठी १०२ वर्षाच्या कृष्णात साहेबराव देशमुख यांनीही मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. करमाळा तालुक्यातील वांगी १, वांगी २, वांगी ३ व वांगी ४- भिवरवाडी, सातोली, बिटरगाव, वडशिवणे व आवाटी या ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया झाली आहे.

गुरुवारी (ता. ४) झालेल्या मतदानामध्ये वांगी १ येथे 1905, वांगी २ येथे १६३४, वांगी ३ येथे २११५ व वांगी ४- भिवरवाडी येथे १०१५, सातोली येथे ९०४, बिटरगाव येथे ११५८, वडशिवणे येथे १६१० व आवाटी येथे १६८० मतदारांनी हक्क बजावला आहे.

तहसीलदार समीर माने यांच्या नियंत्रणाखाली हि मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


आठ ग्रामपंचायतच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी तहसील कार्यालया मध्ये आयोजित केली असून अंदाजे दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतचे निवडणूक निकाल हाती लागण्याची शक्यता आहे

litsbros

Comment here