करमाळा

रेशनकार्डधारकांना रॉकेल पूर्ववत करण्याची मागणी मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

रेशनकार्डधारकांना रॉकेल पूर्ववत करण्याची मागणी मागणी

केत्तूर (अभय माने) शिधापत्रिकेवर रॉकेल वितरण सुरू करण्यात यावे अशी मागणी ॲड.अजित विघ्ने यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, शासनाकडून पूर्वीप्रमाणे शिधापत्रिकेवर अल्प दरात रॉकेल मिळावे.सध्या गॅस सिलेंडरचे दर उच्चांकी पातळीवर गेले आहेत.

हे दर सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर आहेत त्यामुळे गोरगरीब जनता तसेच महिला वर्गाला स्वयंपाक करताना या रॉकेलची मदत होईल तसेच शिधापत्रिकेवर रॉकेल मिळत नसल्याने मृत व्यक्तीचे अंत्यविधी करण्यासाठी अडचणी येत आहे त्यातच रात्री अपरात्री वीज खंडित झाल्यास अंधाराचा सामना करावा लागत आहे.

दिवा लावण्यासाठीही रॉकेल उपलब्ध होत नाही त्यामुळे काही वेळेस रॉकेल नसल्याने रात्र अंधारात काढावी लागत आहे.तसेच रॉकेलवर चालणारे स्टोव्ह व त्यासंबंधीचे कारागीर काम मिळत नसल्याने दिसेनासे झाले आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

शिधापत्रिकेवर रॉकेट उपलब्ध झाल्यास सर्वच वर्गाला न्याय दिल्यासारखी होईल तरी शासनाकडून पूर्ववत शिधापत्रधारकांना रॉकेल मिळावे अशी मागणी विघ्ने यांनी केली आहे.

litsbros

Comment here