करमाळा

करमाळा तालुक्यातील रावगावकर युवकांमध्ये वाढदिवस साजरा करण्याची बदलत आहे पद्धत; सर्वत्र होतेय चर्चा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील रावगावकर युवकांमध्ये वाढदिवस साजरा करण्याची बदलत आहे पद्धत; सर्वत्र होतेय चर्चा

करमाळा(प्रतिनिधी) ; सध्या वाढदिवस साजरा करायचा म्हटले की मोठ मोठे डिजीटल बॅनर, पोस्टर्स, जेवणावळया, मोठ मोठे केक, हार, गुच्छ, फटाके फोडून वाढदिवस साजरा केला जातो परंतू करमाळा तालुक्यातील रावगावकर युवकामधून वाढदिवस साजरा करण्याचे प्रकारात बदल होताना दिसून येत आहे.

काल 1 जून रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त सरपंच दादासाहेब जाधव यांनी आपल्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून त्यानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करून व सध्या कोविड आजारावर दवाखान्यात उपचार घेत असलेले रूग्ण गणेश सुतार यांना वैद्यकीय खर्चासाठी म्हणून पाच हजार एक रूपये रोख रक्कम मदत देण्यात आली.

तसेच मा ग्रामपंचायत सदस्य युवा कार्यकर्ते देविदास बरडे व नानासाहेब शिंदे यांनी मिळून रावगाव येथीलच एकल महिला वसंता सुतार यांना एक महिना पुरेल एवढा किराणा मालाचे किट देण्यात आले.

हेही वाचा- सोलापूर जि.प.सदस्य व अध्यक्षासाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत रणांगणात: सदस्यांचा कालावधी २ वर्षे वाढणार.?

माढा, मोहोळ परिसरात वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेकांच्या घरांवरील उडाले पत्रे; अनेक भागातील वीज गायब

दिनांक 2 जून रोजी सामाजिक कार्यकर्ते भास्कर पवार यांचा वाढदिवस त्यांनीही आपला वाढदिवस साजरा न करता यावर येणाऱ्या खर्चाच्या रक्कमेत राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयास तिन हजार पाचशे रुपये किमतीची गावातील युवकांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी स्पर्धा परीक्षा संच वाचनालयास भेट देण्यात आला.

प्रत्येकाने आपापल्या वाढदिवसाच्या निमित्ताने असे समाजोपयोगी कार्य केल्यास सामाजिक कार्यास मोठा हातभार लागेल.

litsbros

Comment here