आरोग्यकरमाळा

राजुरीत 112 महिलांची मोफत रक्त तपासणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राजुरीत 112 महिलांची मोफत रक्त तपासणी

केत्तूर (अभय माने ) शारदीय नवरात्री महोत्सवानिमित्त जांभळे पॅथॉलॉजी लॅब, करमाळा, करमाळा मेडिकोज गिल्ड व डॉ. दुरंदे हॉस्पिटल, राजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरी (ता.करमाळा) येथे 112 महिलांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.

संपूर्ण घर सांभाळत असताना महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते, त्यामुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता होऊन अनेक आजारांना आमंत्रण मिळते. ज्यावेळेस घरातील महिला आजारी पडते त्यावेळेस संपूर्ण घरचं एकप्रकारे आजारी पडतं.

म्हणून सामाजिक सेवेच्या उद्देशाने या शिबिराचे नियोजन करण्यात आले.या सर्व तपासण्या डॉ. नीलम निलेश जांभळे मॅडम एमडी,पॅथॉलॉजिस्ट यांच्या लॅब मध्ये करण्यात आल्या.

यामध्ये महिलांमधील हिमोग्लोबीन, लिपिड प्रोफाइल, रक्तातील साखर या तपासण्या मोफत करण्यात आल्या.वयाच्या 40 वर्षापुढील महिलांनी तर ब्लड तपासणी नियमितपणे करायला पाहिजे. ता.27 ते ता.5 तारखेपर्यंत रोज सकाळी 6 ते 9 या वेळेत महिलांचे ब्लड सॅम्पल डॉ. दुरंदे हॉस्पिटल,राजुरी येथे घेण्यात आले.

राजुरी मधील शिबिराचे नियोजन डॉ.विद्या अमोल दुरंदे यांनी केले .

राजुरी (तालुका करमाळा) : महिलांची आरोग्य तपासणी करताना डॉ.विद्या दुरंदे

litsbros

Comment here