करमाळासोलापूर जिल्हा

राजूरीच्या लेकीच्या पाठीवर खा.सुप्रिया सुळेंकडून कौतुकाची थाप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राजूरीच्या लेकीच्या पाठीवर खा.सुप्रिया सुळे यांचे कडून कौतुकाची थाप

केत्तूर (अभय माने) राजुरी (ता.करमाळा) येथील पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे (झिंजुर्के ) यांना संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कौतुकाची थाप व शाबासकी देण्यात आली.

पुरंदर (सासवड) पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दगडू दुरंदे यांनी भोर उपविभागामध्ये निर्भयापथक प्रमुखाचे काम यशस्वी, उत्कृष्ट व प्रभावीपणे केल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना शाबासकीची थाप दिली.

सुप्रिया दुरंदे यांना नुकताच राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाचा उत्कृष्ट अपराध सिद्धी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक रितेश कुमार यांच्या हस्ते देण्यात आला होता.

सुप्रिया दुरंदे यांच्या या कामगिरीबद्दल राजुरी (ता. करमाळा ) ग्रामस्थांतून आनंद व्यक्त केला जात आहे.

litsbros

Comment here