करमाळाशैक्षणिक

करमाळा तालुक्यातील राजुरी गावच्या सुकन्याचे सी.ए परीक्षेत यश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील राजुरी गावच्या सुकन्याचे सी.ए परीक्षेत यश

केतूर (अभय माने) राजुरी तालुका करमाळा येथील कु.सुकन्या प्रकाश लोखंडे हिने देशातील अत्यंत प्रतिष्ठित परीक्षापैकी एक असलेल्या सी ए च्या परीक्षेत यश संपादन केले असून त्यामध्ये ती उत्तीर्ण झाली आहे.

सुकन्या ही राजुरी येथील रहिवासी प्रकाश लोखंडे यांची कन्या आहे . तर लालासाहेब लोखंडे यांची पुतणी आहे.तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण फातिमा हायस्कूल बदलापूर ,जिल्हा. ठाणे येथे इंग्रजी माध्यमातून झाले .तर महाविद्यालयीन शिक्षण मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई येथे झाले आहे.

तिचे वडील नोकरी निमित्त बदलापूर जिल्हा ठाणे येथे स्थायिक आहेत. करमाळा तालुक्यामधून मुलींमध्ये सीए होण्याचा मान तिला मिळाला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून अभ्यासाबरोबरच बदलापूर परिसरामध्ये समाजकार्य करत तिने हे यश संपादन केले आहे.

तिच्या या यशाबद्दल राजुरी ग्रामस्थांतर्फे तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.

litsbros

Comment here