करमाळा

राजुरी गावच्या लेकीला महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाचा उत्कृष्ट अपराध सिद्धी पोलीस पुरस्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राजुरी गावच्या लेकीला महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाचा उत्कृष्ट अपराध सिद्धी पोलीस पुरस्कार

केत्तूर (अभय माने) सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील तेरा वर्षीय लहान मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला होता शिराळा पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दगडू दुरंदे यांनी आरोपीस तात्काळ अटक करून कौशल्यपूर्ण तपास केला.

त्यानंतर थोड्याच दिवसात इस्लामपूर सत्र न्यायालयाने आरोपीस 20 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावून पीडित कुटुंबास न्याय दिला या कौशल्यपूर्ण तपासाच्या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांच्या वतीने सोमवार (ता.1 ) ऑगस्ट 2022 रोजी पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दगडू दुरंदे (झिंजुर्के) यांना राज्यातील सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पोलीस पुरस्काराने गौरविण्यात आले.

त्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आला या कामगिरीबद्दल राजुरी (ता.करमाळा) ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

छायाचित्र– सुप्रिया दुरंदे
सुप्रिया दुरंदे यांचा सत्कार करताना पोलीस महासंचालक रितेश कुमार

litsbros

Comment here