करमाळा तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष म्हणतात, तालुक्यातील इतर गावांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तत्काळ लम्पीचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे
केत्तूर ( अभय माने) लंपी आजाराची वाढलेली व्याप्ती पाहता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावरांच लसीकरण होणे गरजेचं आहे या अनुषंगाने राजुरी ग्रामपंचायतिच्या वतीने आज सकाळी ८ वाजता सरपंच डॉ. अमोल दुरंदे, (तालुकाध्यक्ष सरपंच परिषद करमाळा) यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश झोळ यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाला सुरवात झाली आहे..शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ मंगेश झोळ तसेच त्यांच्या टीमच्या माध्यमातून हे लसीकरण करून घ्यायचे आहे.
डॉ. वाघमारे, डॉ. बाबर यांनी लसीकरण करण्यास सहकार्य केले. लंम्पि ची कोणतीही लक्षणे दिसून आल्यास ग्रामपंचायत किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
तसेच तालुक्यातील इतर गावांनी शासनाचे लसीची वाट न बघता आपल्या गावातील जनावरे वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लसीकरण करून घ्यावे, असे सरपंच डॉ. अमोल दुरंदे म्हणाले.
लसीकरण शुभारंभ वेळी बिबीशन जगताप, कल्याण दुरंदे, आप्पा टापरे,दीपक साखरे,आत्माराम दुरंदे, तुकाराम दुरंदे उपस्थित होते.
Comment here