करमाळा

राजुरी येथील ३३ केव्ही सबस्टेशनला मंजुरी; कविटगाव आणि कव्हे येथील ॲडिशनल ट्रान्सफार्मला मान्यता

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राजुरी येथील ३३ केव्ही सबस्टेशनला मंजुरी; कविटगाव आणि कव्हे येथील ॲडिशनल ट्रान्सफार्मला मान्यता

केतूर ( अभय माने ): करमाळा तालुक्यातील मौजे. राजुरी येथिल शेतकरी व नागरिकांचे मागणीनुसार महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे 33 केव्हीचे सब स्टेशनला मंजुरी मिळाली असलेबाबतची माहीती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

सदर ठिकाणी पश्चिम भागातील शेतकऱ्यांची मागणीचा प्रामुख्याने विचार करून, राजुरी आणि पोमलवाडी सब स्टेशन करीता मागणीचा पाठपुरावा चालु केला होता.

त्यापैकी राजुरी येथे 33 केव्ही सब स्टेशन आणि कविटगाव व कव्हे येथे ॲडिशनल ट्रान्सफार्मर ला मंजुरी मिळाली आहे, करमाळा तालुक्यातील कात्रज, आवाटी, रायगाव व इतर ठिकाणी देखिल मागिल कालावधीत कामे मार्गी लावलेली असुन, राजुरी येथील सब स्टेशनसह सर्व कामे लवकरच चालु होतील याची माहीती दिली आहे.

litsbros

Comment here