करमाळा तालुक्यात मंडल स्तरावरील पर्जन्यमान मोजण्याची कालबाह्य पद्धत बंद करून ग्रामपंचायत निहाय पर्जन्यमापक बसवण्याची मागणी
केतूर ( अभय माने) जून महिना सरला तरी पावसाने करमाळा तालुक्यात अनेक गावात ओढ दिली आहे. तालुक्यातील ८ मंडळांपैकी कोर्टी व जेऊर परिमंडळात १०० मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पेरणी योग्य पर्जन्यमान झाले असल्याची नोंद कृषि विभागाने घेतलीआहे.
परंतु हा पाऊस मंडळात सर्वदूर न होता ज्या ठिकाणी पर्जन्यमापक बसवले आहे.त्या ठिकाणीच जास्त झाला आहे.मंडळातील ईतर गावांमध्ये अजूनही शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.
पावसाअभावी पेरणी लांबणीवर पडल्याने खरीप हंगाम हातचा निघून जाण्याची धास्ती शेतकर्याना लागली आहे.तर काही शेतकर्यानी कमी ओलीवरच पेरणी केली आहे.पंरतु कोर्टी व जेऊर मंडळातील पर्जन्यमापकाच्या मुख्य ठिकाणीच १००मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
त्यामुळे एकाच ठिकानाहून पंधरा ते वीस गावातील पर्जन्यमान मोजण्याच्या कालबाह्य पद्धतीमुळे शेतकर्यांना अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान, दुष्काळ निधी,पिक विमा अशा योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.
त्यामुळे शासनाने यात बदल करून ग्रामपंचायत निहाय पर्जन्यमापक बसवावे अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
” जून महिना संपला तरी पावसाने हजेरी लावली नाही.त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे.परंतू माझी शेती असलेल्या कोर्टी मंडळातील पर्जन्यमापकात पेरणी योग्य पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.त्यामुळे शासनाने ग्रामपंचायत निहाय पर्जन्यमापक बसवावे.त्यामुळे अतिृष्टीमुळे होणारे नुकसान, दुष्काळ निधी,पिक विमा मिळण्यापासून शेतकर्याना वंचित रहावे लागनार नाही.
– महेंद्र देशमुख.
कुंभारगाव. ता. करमाळा
Comment here