पंढरपूरसोलापूर जिल्हा

जि.प.प्रा.शाळा देगाव येथे सात नोव्हेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन म्हणजेच ‘विद्यार्थी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जि.प.प्रा.शाळा देगाव येथे सात नोव्हेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन म्हणजेच ‘विद्यार्थी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा

उपळवटे (प्रतिनिधी); पंढरपूर तालुक्यातील देगाव येथिल जि.प.प्रा.शाळेमध्ये सात नोव्हेंबर विद्यार्थ्यी दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला आहे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन देगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री गो.रा. कुलकर्णी यांनी केले.

तसेच सर्व शिक्षक शिक्षिका यांनी प्रतिमा पूजन केले.या कार्यक्रमाप्रसंगी देगाव शाळेचे विज्ञान विषयी शिक्षक श्री पाटोळे सर यांनी 7 नोव्हेंबर शिक्षक दिन याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की महामानव ,प्रज्ञासूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार ,बोधिसत्व ,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा जिल्ह्यातील गव्हर्मेंट स्कूलमध्ये सात नंबर 1900 रोजी प्रवेश घेतला आणि शिक्षणाची सुरुवात केली. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय संघर्ष चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर बिकट परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेऊन भारतीय घटनेचे शिल्पकार झाले आणि त्यांनी स्वतःला जीवनभर आजन्म विद्यार्थीच मानले.

त्यामुळे त्यांचा शाळेतील प्रवेशाचा पहिला दिवस हा विद्यार्थी दिन म्हणून 2017 पासून साजरा करण्यात येत आहे ज्या बाबासाहेबांना मनुवादी व्यवस्थेने शाळेमध्ये प्रवेश नाकारला शिक्षणाचा हक्क नाकारला त्याच व्यवस्थेला आज बाबासाहेबांचा शाळेतील पहिला दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करावा लागतो हा बाबासाहेबांच्या विचाराचा कर्तुत्वाचा विजय आहे.

देगाव येथिल जि प.प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनी बाबासाहेबांचे अनुकरण करून आपणही जिद्द, चिकाटी, परिश्रम, अभ्यासाच्या जोरावर उच्च विद्वत्ता प्राप्त करून आपले जीवनात सुधारणा करावी .आपली परिस्थिती सुधारावी असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक श्री गो. रा.कुलकर्णी सर,पदवीधर शिक्षक श्री पवार सर, विषय शिक्षक श्री पाटोळे सर, श्री बंगाळे सर ,श्री भोई सर तसेच शिक्षिका गुरसाळकर, मॅडम वाघमारे, मॅडम कुलकर्णी मॅडम उपस्थित होत्या.

litsbros

Comment here