आरोग्यकरमाळा

पोमलवाडी येथे वडीलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मुलांनी शाळेला दिली भेटवस्तू; तसेच गावात रक्तदान शिबिर व कीर्तन संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पोमलवाडी येथे वडीलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मुलांनी शाळेला दिली भेटवस्तू; तसेच गावात रक्तदान शिबिर व कीर्तन संपन्न

केतूर (अभय माने) गुरुवार (ता.13) रोजी पोमलवाडी ( ता. करमाळा ) येथिल रहीवाशी स्व. कै. विनायक दगडू फाळके यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त ह. भ. प. छगन खडके महाराज (प्रति इंदोरीकर) यांचे फुलाचे किर्तन संपन्न झाले.

यावेळी स्व. कै. विनायक दगडू फाळके यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त जि प प्रा शाळा पोमलवाडी यांना स्व.विनायक दगडु फाळके यांचे पुण्य स्मरणार्थ व्यासपीठ ( Dias) सप्रेम भेट देण्यात आले, तसेच याप्रसंगी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरास स्वयंस्फुर्तीने लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी 60 हून अधिक लोकांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरास श्री. भगवंत ब्लड बँक सेंटर, बार्शीचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे, विजय तोडकरी, सुयोग निकम, राधिका बेले, प्रणाली घोंगाणे ,यांनी यशस्वीरीत्या रक्तसंकलन केले.

हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यात डी. सी. सी. बँक मॅनेजर राजेंद्र रणशिंग ,सो. उपजिल्हा शिवसेना प्रमुख सुर्यकांत पाटील, केत्तूरचे माजी सरपंच ॲॅड. अजित विघ्ने, सुहास एकाड, संग्राम पाटील,दत्ता काळे, संभाजी भोपते, पोपट फाळके, दत्ता काटे व गौळवाडी, पोमलवाडी ,खातगाव व परिसरातील ग्रामस्थांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी परशुराम विनायक फाळके, राजेंद्र विनायक फाळके , नवनाथ विनायक फाळके व समस्त फाळके परिवाराचे वतीने कोव्हीड मधे विशेष कार्य बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका, पोलिस मित्र, आशा वर्कर यांचा ही सन्मान करण्यात आला.

litsbros

Comment here