Uncategorized

व्यापारी संकुलाला जयवंतराव जगताप यांचे नाव असल्याने विरोधकांनी त्या कामाच्या दर्जाची चिंता करू नये; आज आरडाओरडा करणारे तेव्हा हॉंगकॉंगला गेलेले का.?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

व्यापारी संकुलाला जयवंतराव जगताप यांचे नाव असल्याने विरोधकांनी त्या कामाच्या दर्जाची चिंता करू नये; आज आरडाओरडा करणारे तेव्हा हॉंगकॉंगला गेलेले का.?

करमाळा (प्रतिनिधी )करमाळा नगरपरिषदेला विकास कामांसाठी निधीची उपलब्धता करून देणे ही माझी जबाबदारी, पण करण्यात येत असलेले काम निकृष्ट, आकृष्ट, की उत्कृष्ट होत आहे हे पाहण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे स्पष्ट व रोखठोक मत नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.

नुकतेच एका विरोधी नगरसेवकाने ‘बनी तो बनी नही तो अब्दुलगनी’ या हिशोबाने केवळ विरोधासाठी विरोध दर्शवून संबंधीत गटाकडून आपली आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीची उमेदवारी फिक्स करण्याच्या दुष्ट नितीने नगरपरिषदेच्यावतीने बांधण्यात आलेल्या नविन भाजी मंडई जवळील व्यापारी संकुल निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा कांगावा करून “मुझे गिनो -मुझे गिनो “असा प्रकार करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

परंतु यासंदर्भात मला म्हणावेसे वाटते की सदरचे बांधकाम सुरू असताना हे आरडाओरडा करू लागलेले काय हाँगकाँगला गेलते, की भूमिगत होते? असा माझा जाहीर सवाल आहे . या कांगावेबाजांना असे म्हणून ते म्हणाले मग त्याचवेळी गप्प बसून बघ्याची भूमिका आपण घेतली ती का घेतली असा प्रश्न सुजाण जनतेला पडला नसेल हे शक्यच नाही “ये पब्लिक है, ये सब जानती है “कदाचित याचा त्यांना विसर पडला आहे.

यानंतर पुढे बोलताना वैभवराजे जगताप म्हणाले की, जनतेच्या केवढ्या -रेवड्यानी जमवलेल्या पैशांची हे जास्त काळजी व कळवळा आणत आज “पुतनाबाई “चा आव आणत आहेत. त्यांची नितीमत्ता, वर्तुणुक, वैचारिकता करमाळा शहरच काय संपुर्ण तालुका जाणतो -पहातो व अनुभवतो आहे. शेतकऱ्यांच , कष्टकऱ्यांच्या, बाजाराकरूंच्या किती हिताचा विचार करून त्यांच्या मालाची किंमत करून किती सौजन्याने ‘पठाणी वसुली’ करतात , पाच रुपयाची पावतीचे 500 /–रू घेवून कंबरड्यात प्रसंगी लाथ मारतात.

मग यावेळी काय हे लोक केवढ्या-रेवड्यानी नाहीत का पैसे जमवून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत ?नाही पण आपला आर्थिक स्वार्थ समोर आला की सगळ्या, भावना, व जनतेची कदर पायदळी तुडवत फक्त हातातली बॅग भरणे हेच कळत. आणि मग आदिनाथ -मकाई कारखान्यातील कर्मचारी, उस उत्पादक शेतकरी, शेतमजूर, सभासद आज त्यांच्या नेत्याला शिव्या -शाप -तळतळाट. देत आहेत.

ही संपूर्ण परिस्थिती या नगरसेवकाला आपल्या नेत्यामुळे झाली असल्याचे माहीती असताना त्या नेत्याला याचा जाब विचारण्याची का हिम्मत नाही होत तुमची ? इथे कशी काय “तेरी भी चुप मेरी भी चुप “ठेवून गप्प बसता. सगळे “चंगु -मंगुची टोळी अन् एकमेकाचे साथीदार ! 

हेही वाचा- मोठी बातमी; ‘या’ आठ राज्यातील राज्यपाल बदलले; वाचा कोण नवे राज्यपाल.?

शिवीगाळ करत महिलेवर केले कोयत्याने वार, करमाळा तालुक्यातील घटना

शेवटी बोलताना वैभवराजे म्हणाले की, धन्यवाद नगरसेवक सचिन घोलप यांचे निदान त्यांनी आपले जुने नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नावाची काळजी घेतली ! पण मी एक सांगु इच्छितो की जयवंतराव जगताप एक मोठा करिश्मा व तालुक्यासाठी फरिश्ता आहेत, जे त्यांच्या सानिध्यात आले त्यांना मोठेपण मिळत गेले मग हे तर संकुललला त्यांचे नाव दिले आहे. त्यामुळे घाबरू नका हे व्यापारी संकुल उत्कृष्ट व भक्कम राहणार त्याची तुम्ही जास्त चिंता करू नका. असा उपरोधिक टोलाटोला शेवटी नगराध्यक्ष जगताप यांनी दिला.

होत असलेल्या प्रत्येक कामावेळी संबंधीत ठेकेदाराची काम चांगले नाही झाले अगर लवकर खराब झाले तर त्याची भरपाई करण्यासाठी 30%रक्कम संबंधीत ठेकेदाराची आनामत म्हणून नगर परिषद ठेवून घेते.बहुतांश कामे घेणारे ठेकेदार हे यांचेच जवळचे पाहुणे -रावळे आहेत.

– नगराध्यक्ष वैभवराजे जगताप

litsbros

Comment here