करमाळासोलापूर जिल्हा

ब्रेकिंग न्यूज- करमाळयाच्या राजकारणात पुन्हा खळबळ; कृषी उत्पन्न बाजार समितीतील ‘या’ सदस्याचे सदस्यत्व रद्द

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ब्रेकिंग न्यूज- करमाळयाच्या राजकारणात पुन्हा खळबळ; कृषी उत्पन्न बाजार समितीतील ‘या’ सदस्याचे सदस्यत्व रद्द

उमरड (प्रतिनिधी) बाजार समिती निवडणुकीनंतर सत्ता स्थापने वेळी झालेल्या कलहाने संपुर्ण राज्यात चर्चेचा विषय झालेली करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती ही सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झालेली आहे. सतत एकमेकांवर केले जाणारे आरोप प्रत्यारोप, दावे प्रतीदावे आणि एकमेकांच्या विरोधात तक्रारी यांनी पुन्हा पुन्हा बाजार समितीचे राजकारण पेट घेत आहे. 

अशातच आता जगताप घराण्यातील युवानेते नवी पिढी जयवंतराव जगताप यांचे पुत्र शंभूराजे जगताप यांनी बाजार समितीचे संचालक चिंतामणी जगताप यांच्यावर घेतलेल्या आक्षेपाच्या तक्रारीचा निकाल उपनिबंधक यांनी दिल्याने राजकारण ढवळून निघाले आहे.

30/10/2021 करमाळा बाजार समितीचे विद्यमान उपसभापती चिंतामणी जगताप यांचे बाजार समितीचे सदस्यत्व कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांनी रद्द केले आहे. उपसभापती चिंतामणी जगताप यांचेकडे करारान्वये बाजार समितीचा नोंदणीकृत भूखंड असून त्यांनी त्याचे भाडे देखील भरलेले नाही.

सबब समितीशी प्रत्यक्ष संविदा /करार व थकबाकीदार असल्याने त्यांना अपात्र घोषित करून बाजार समितीचे सदस्यत्व रद्द करणेबाबत जगताप गटाचे युवानेते शंभुराजे जयवंतराव जगताप यांनी जिल्हा उपनिबंधक सह . संस्था सोलापूर यांचेकडे ॲड. कमलाकर वीर यांचेमार्फत अपील दाखल केले होते .

हेही वाचा- पोलीस भरतीत उंची वाढवण्यासाठी तरुणाने केली ‘ही’ आयडिया; चाणाक्ष सोलापूर पोलिसांनी मात्र पकडलेच

मागासवर्गीय सरपंचाला चपलेचा हार; करमाळा तहसील समोर निदर्शने

या अपीलावर लेखी व तोंडी युक्तिवाद,सुनावणी होवून श्री .कुंदन भोळे जिल्हा उपनिबंधक सहकारी स्था सोलापूर यांनी चिंतामणी जगताप यांना अपात्र घोषित करीत त्यांचे बाजार समिती सदस्यत्त्व रद्दबातल ठरविले आहे.

चिंतामणी जगताप हे बाजार समिती सदस्य असण्यासाठी अपात्र ठरत असल्याने त्यांना आदेशाच्या दिनांकापासून म्हणजेच २१ ऑक्टोंबर २०२१ पासून सदस्य पदावरून कमी करण्यात येत असले बाबत देखील आदेशात म्हटले आहे .

या अपीलामधे अर्जदार शंभुराजे जयवंतराव जगताप यांचे वतीने ॲड. कमलाकर वीर , चिंतामणी जगताप यांचे वतीने ॲड. राऊत व त्रयस्थ अर्जदार सभापती बंडगर यांचे वतीने ॲड. दुरगुडे यांनी कामकाज पाहीले .

litsbros

Comment here