करमाळापंढरपूरराजकारणसोलापूर जिल्हा

‘पंढरपूरचा पराभव आणि उजनीचे पाणी’ हे दोन्ही धक्के आमदार शिंदे यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेले दिसतात..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

‘पंढरपूरचा पराभव आणि उजनीचे पाणी’ हे दोन्ही धक्के आमदार शिंदे यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेले दिसतात..

जेउर (प्रतिनिधी) : पंढरपुर मतदार संघातील पराभव व इंदापुरला जाणारे पाणी थांबवले जाणे हे दोन धक्के आमदार संजय शिंदे यांच्या जिव्हारी चांगलेच लागले असुन यातुन सावरण्यास त्यांना आता बराच वेळ लागतो की काय, अशी खोचक टीका माजी आमदार नारायण पाटील यांनी केली.

2004 साली कृष्णा-मराठवाडा योजनेस मंजुरी देत असताना नारायण पाटील यांनी यास विरोध का केला नाही? असा सवाल आ.संजय शिंदे यांनी केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना नारायण पाटील म्हणाले की, मतदार संघात घडणाऱ्या चांगल्या कामाचे श्रेय जसे आमदार यांना मिळत असते तसेच त्या कालावधीत घडणाऱ्या काही नुकसानकारक घटना वा निर्णयासही जनता आमदार यांनाच जबाबदार धरते व याबाबत प्रश्न विचारते.

सन 2004 साली मराठवाड्यास पाणी कसे जाऊ दिले? हा प्रश्न संजय शिंदे यांनी खरे तर तत्कालीन आमदार यांनाच विचारावयास हवा होता. पण मला नाही वाटत की आमदार शिंदे हा प्रश्न करमाळा मतदार संघाचे तत्कालीन आमदार यांना विचारण्याचे धाडस करतील.

मी जर 2004 साली आमदार असतो तर निश्चितच मराठवाड्यास जाणाऱ्या पाण्यास विरोध केला असता. मराठवाड्यास उजनीतुन पाणी देण्याचा निर्णय हा आघाडी सरकारच्या कालावधीत झाला. त्यामुळे आता आमदार संजय शिंदे यांनी आताच्या महाविकास आघाडी सरकारला दिलेला पाठींबा काढून घेण्याची हिंमत दाखवावी.

मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाचा आदर करणे यात काय चुकीचे आहे हेच समजत नाही. आज सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश नेते मंडळी ही मोहिते-पाटील यांच्याच नेतृत्वाखाली काम करत राजकीयदृष्ट्या स्थिरावली आहेत.

हेही वाचा- करमाळा पोलिसांनी पकडली संत्रा देशी दारूच्या बॉक्स ने भरलेली बोलेरो; 7 लाखापेक्षा जास्त किमतीचा माल जप्त

सोने घ्यायचा विचार करताय तर नक्की वाचा; आज सोन्याच्या दरात मोठी घसरण; क्लिक करून वाचा आजचा दर

यात एकेकाळी शिंदे घराणे सुध्दा मोहिते-पाटील यांचेच नेतृत्व मानत होते याचा विसर आमदार संजय शिंदे यांना पडला असावा. वास्तविक संघर्षातुन व जनतेची कामे करुन मी आमदार या पदापर्यंत पोहचलो आहे हे जिल्ह्यातील सर्वांना ठाऊक आहे.

सन 2014 साली आ. संजय शिंदे यांना पराभुत करुनच मी आमदारपद मिळवले होते. हा इतिहास शिंदे यांनी विसरु नये. प्रमुख विरोधीपक्ष म्हणुन आ. संजय शिंदे यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार मला जनतेने दिला असून करमाळा मतदार संघातील विकासकामांबाबत मी विचारणा करतच राहणार.

2019 साली मी जशी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तशीच संजय शिंदे यांनी सुध्दा अपक्ष म्हणूनच निवडणुक लढवली होती. यामुळे अगोदर आपण कोणत्या पक्षाचे आहोत हे आतातरी आ. संजय शिंदे यांनी जनतेसमोर मांडावे,असेही नारायण पाटील म्हणाले.

litsbros

Comment here