जगतापांचा राजकीय बॉम्ब; जयवंतराव जगताप यांनी घेतली काँगेसचे ना.बाळासाहेब थोरात यांची भेट; बंद खोलीत चर्चा
करमाळा (प्रतिनिधी) ; महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते ना . बाळासाहेब थोरात यांची नुकतीच माजी आ जयवंतराव जगताप यांनी भेट घेतली . यावेळी ना .थोरात व माजी आ. जगताप यांच्यात २५ मिनीटे बंद खोलीत चर्चा झाली.
या चर्चेचा तपशील जरी समजू शकला नसला तरी ना . थोरात यांनी माजी आ. जयवंतराव जगताप यांना काँग्रेस पक्षाचे सक्रियपणे काम करणे विषयी सूचना करून राज्य शासन व काँग्रेस पक्ष जगताप यांच्या पाठीशी ठामपणे राहील अशी ग्वाही ना . थोरात यांनी दिल्याचे समजते .
यशवंतराव चव्हाण यांचे कारकिर्दीत ना . थोरात यांचे वडील सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात व माजी आ. जगताप यांचे वडील देशभक्त नामदेवराव जगताप यांचे अतिशय स्नेहाचे व मित्रत्वाचे संबंध होते .
Comment here