करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

जगताप गटात उत्साह वाढवणाऱ्या ‘या’ दोन महत्त्वाच्या बातम्या; करमाळा तालुक्याच्या राजकारणात उलथापालथ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जगताप गटात उत्साह वाढवणाऱ्या ‘या’ दोन महत्त्वाच्या बातम्या; करमाळा तालुक्याच्या राजकारणात उलथापालथ

करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदासाठी माजी आमदार नारायण पाटील गट व माजी आमदार जयवंतराव जगताप गटात रस्सीखेच सुरु होती. कोण कोणावर भारी पडतेय याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. 

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदाच्या निवडीत अखेर जयवंतराव जगताप यांनी बाजी मारली आहे, आणि मावळते सचिव शिंदे यांनी सचिव पदाची सूत्र जगताप गटाचे विठ्ठल क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द केली. आणि सत्ताधारी गटाला माघार घ्यावी लागली.

तर दुसरी महत्वाची बातमी म्हणजे माजी आ जगताप यांचे विरोधातील अपील फेटाळले आहे. त्याचे सविस्तर वृत्त असे की, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे बाजार समिती सदस्यत्व रद्द करणे बाबतचे दाखल केलेले अपील जिल्हा उपनिबंधक सह संस्था सोलापूर यांच्याकडे दाखल करण्यात आले होते.

 या खटल्यात जगताप यांचे वतीने अँड. कमलाकर वीर यांनी काम पाहीले .माजी आ .जगताप हे सन १९८९ पासून २०१८ पर्यंत सलग २९ वर्षे बाजार समितीचे सभापती होते . 

हेही वाचा- माढा तालुक्यात आज सोमवारी ४६ कोरोना पॉझिटिव्ह तर ३ जनांचा मृत्यू;वाचा- गावनिहाय रूग्णसंख्या

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांत होणार ७०० एकरात गवताची लागवड

मध्यंतरीच्या काळात राजकीय कुरघोड्यांमुळे व षडयंत्रांमुळे जगताप गट सत्तेपासून वंचित राहिला.  कोर्टाच्या या निर्णयामुळे जगताप गटाच्या कार्यकर्त्यांत आनंद पसरला आहे, तर बाजार समितीत आता जगताप यांचं स्थान अधिक मजबूत झाले आहे.

litsbros

Comment here