आदिनाथचे लवकरात लवकर नवे संचालक मंडळ करून कारखाना तात्काळ सुरू होणे गरजेचे; शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका
करमाळा(प्रतिनिधी) ; आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादकांचे खूप हाल होत आहे कारखान्याबाबत राजकारण न करता कुणीही कारखाना घ्यावा व चालू करावा असे आव्हान माजी संचालक डॉक्टर वसंत पुंडे यांनी केले आहे.
कारखान्याची काय परिस्थिती आहे? हे सर्वांना माहीत आहे सध्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकरी रडकुंडीला आला आहे. वैतागलेला आहे त्यामुळे आता पुढील सीजन तरी कारखाना चालू होईल का नाही हेही सांगता येत नाही आज आदिनाथ तेवढा अडचणीत कसा आला याचा शोध बोध न घेता चालू कसा होईल हे पाहणे आवश्यक आहे.
सध्यातरी साखर वेळेवर न विकल्याने बँकेने ताबा घेतला त्याचा लिलाव तो कायदेशीर योग्य नियमानुसार आहे का? इत्यादी सर्व गोष्टी सभासदांपर्यंत आल्या नाही. सध्या कोर्ट कचेरी करत जर ही मंडळी बसली तर त्यातून काहीच गोष्टी वेळेवर होणार नाही पुढील सिजन चालू करण्यास अडचणी येतील, काळ कोणासाठी थांबत नाही व तो थांबणार नाही आदिनाथची खरी परिस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे.
त्यातून सकारात्मक व आशादायी मार्ग सर्वांनी मिळून काढणे नितांत गरजेचे आहे काळ निघून गेल्यावर चर्चांचा काहीच उपयोग होणार नाही तरुण युवकाने यात हिरिरीने भाग घेऊन पुन्हा एकदा आदिनाथ उर्जित अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे ही माफक अपेक्षा आहे.सध्याचे संचालक मंडळाची मुदत संपली आहे लवकरच नवीन संचालक मंडळाच्या निवडणुका होणे आवश्यक आहे.
तोपर्यंत आदिनाथ वर प्रशासक नेमणूक करावी व सीजन कसल्याही परिस्थितीत चालू करावा असेही अखेर माजी संचालक डॉक्टर वसंत पुंडे यांनी सांगितले आहे
Comment here