करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

भोंदूबाबा मनोहर भोसलेला ‘या’ कारणामुळे करमाळा तुरुंगातून आज नेले सोलापूरला

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भोंदूबाबा मनोहर भोसलेला ‘या’ कारणामुळे करमाळा तुरुंगातून आज नेले सोलापूरला

करमाळा(प्रतिनिधी) ; आपल्या अनेक भोंदू करामतींनी गजाआड गेलेला उंदरगावचा भोंदूबाबा मनोहर भोसले १९ सप्टेंबर पासून करमाळा येथील तुरुंगात आहे. त्याला २० सप्टेंबरला कोर्टात हजर केल्यावर कोर्टाने त्यास ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आणि त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला.

आज शुक्रवारी छातीत दुखू लागल्याच्या कारणाने मनोहर भोसले यास करमाळा येथील कुटीर रूग्णालयात नेऊन तपासणी करण्यात आली व नंतर तेथून थेट सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. यावेळी नागरिकांनी बघायला गर्दी केली होती. 

मनोहर भोसले विरोधात ज्यांच्या तक्रारी असतील त्यांनी पुढे यावे असे आवाहन सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. आता या प्रकरणी पुढे काय काय होते.? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा- ब्रेकिंग- कालच्या जोरदार पावसात वगळीत मोटारसायकल पडून करमाळा तालुक्यातील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; क्लिक करून वाचा सविस्तर

‘इथे म्हैस का चारतो.?’ म्हणून तिघांची एकास मारहाण; करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

litsbros

Comment here