मनोहर भोसले करमाळा पोलिसांच्या ताब्यात; आरोग्य तपासणी करून डांबला तुरुंगात
करमाळा(प्रतिनिधी) ; भोंदूबाबा मनोहर भोसले यास 9 सप्टेंबर रोजी बारामती पोलीसांनी अटक केली तेव्हापासून आजपर्यंत तो बारामती पोलिसांच्या ताब्यात होता. कोर्टाच्या निर्णयानंतर आज दुपारी 1 वाजता मनोहर भोसले यास करमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
त्यांनतर त्याची वैद्यकीय तपासणी येथील करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात केली असून मग त्याची रवानगी कोठडीत केली आहे.
मनोहर भोसले बाबत करमाळा पोलीस स्टेशनला 9 सप्टेंबरला रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच दिवशी बारामती पोलीसातही फसवणूक व बुवाबाजी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान 10 सप्टेंबरला पुणे एल सी बी पोलीसांनी सातारा जिल्ह्यातून भोसलेला अटक केली व बारामती पोलीसांच्या ताब्यात दिले.
त्यानंतर भोसले ला प्रथम पाच दिवस व नंतर तीन पोलीस कोठडी दिली होती. बारामती न्यायालयाची आज(ता.19) भोसले ची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
दरम्यान करमाळा पोलीस कार्यालयाचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे स्वतः बारामती न्यायालयात गेले होते. त्यांनी करमाळा पोलीसात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तपासकामी भोसले ची मागणी केली. त्यानुसार बारामती न्यायालयाने मान्यता दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस उपनिरिक्षक श्री. साने व इतर पोलिसांनी मनोहर भोसले यास आज करमाळा येथे आणले.
आता उद्या (ता.20) करमाळा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाकडे पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अपर अधिक्षक हिमंतराव भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.विशाल हिरे यांचे विशेष लक्ष आहे.
तसेच मनोहर भोसले चे पुढे काय होते याकडे तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष आहे.
Comment here