करमाळाक्राइम

सात हजाराची लाच घेताना करमाळा पोलीस स्टेशनच्या ‘या’ पोलिसाला रंगेहात पकडले

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सात हजाराची लाच घेताना करमाळा पोलीस स्टेशनच्या ‘या’ पोलिसाला रंगेहात पकडले

करमाळा(प्रतिनिधी) ; जनतेचे रक्षण करण्यासाठी पोलीस आहेत पण जेव्हा हे पोलिसच गोरगरीब जनतेची फसवणूक करतात तेव्हा सामान्य माणसाचा यंत्रणेवरचा विश्वास उडतो. अशीच कुंपण च शेत खाते अशी अवस्था करमाळा पोलीस स्टेशन मधील एका पोलिसाच्या कृत्याने झाली आहे.

एका महिलेची अटक टाळण्यासाठी त्यांच्याकडून या पोलिसाने 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. पण तिच्या पतीने सोलापूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्याने त्या पोलिसाचा प्लॅन फसला आणि तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. करमाळा पोलीस स्टेशन मधील शशिकांत तुकाराम वाळेकर ( वय ४९) असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

ही घटना बुधवार दि. 13 ऑक्टोबर रोजी घडली. लाचलुचपत विभागाने त्याला ७००० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडून तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा- कोरोनाने कुटुंबप्रमुख गेलेल्या शेटफळ येथील कुटुंबाला ‘जगदीशब्द फाउंडेशन’चा आधार

खांबेवाडी तालुका करमाळा येथील महिला पैलवानाचे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर विभागाचे पोलिस उप अधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

litsbros

Comment here