करमाळामाणुसकीसोलापूर जिल्हा

पोलिसांना पाहून पारधी समाजाच्या ‘त्या’ महिला लागल्या पळू, पण करमाळयाचे पोलीस निरीक्षकांनी ताई म्हणत, बांधून घेतली राखी व दिला धीर..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पोलिसांना पाहून पारधी समाजाच्या ‘त्या’ महिला लागल्या पळू, पण करमाळयाचे पोलीस निरीक्षकांनी ताई म्हणत, बांधून घेतली राखी व दिला धीर..

उमरड(प्रतिनिधी) करमाळा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी मौजें भगतवाडी शिवारातील पारधी समाजाचे वस्तीवर भेट दिली असता त्यामधील काही महीला पोलीस आल्याचे भितीने पळुन जावु लागल्या, त्यावेळी पोलीसांकडून बोलावून घेतले.

नंतर उपस्थित महीला कडे त्यांची विचारपुस करून त्यांचेशी संवाद साधुन राखी पोर्णीमेचे निमित्त वस्तीवर हजर असणारे महीला नामे जया काळे, जोशना इंतक या काळे तसेच इतर महीला यांचे कडुन पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे व सोबत असणारे कर्मचारी यांनी राखी बांधुन घेतली.

त्यावेळी पारधी समाजाचे महीला भावुक झाल्या होत्या. सदरचे वेळी मौजे भगतवाडी गांवाचे सरपंच सुनिल दत्तात्रय तानवडे हे हजर होते. पोलीसांनी पारधी समाजाचे महीला कडुन राखी बांधुन घेतल्याने सर्व गांवातुन व तालुक्यातून पोलीसा विषयी समाधान व्यक्त होत आहे.

उपस्थित महीला यांना पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी काही अडचणी असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क करा विनाकारण कोणास त्रास देऊ नका, तुम्हाला कोणी त्रास दिला तर आम्हास सांगा असे अहवान करून मोबाईल नंबर देण्यात आला आहे. सदर वेळी करमाळा पोलीस ठाणे कडील पोलीस हवालदार हराळे, विलास रणदिवे,

पोलीस नाईक अमोल अवघडे, चंद्रकांत ढवळे, पोलीस अंमलदार हनुमंत गवळी, सिध्देशर लोंढे, तौफीक काझी, सोमनाथ जगताप, नितीन डाकवाले, सोमनाथ कांबळे, महीला पो कॉ जया अनारसे उपस्थित होते.

हेही वाचा- सोलापुरातील करमाळयासह ‘या’ पाच तालुक्यात आजपासून अनलॉक; काय सुरू राहणार?

धक्कादायक: मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचं अपहरण, नंतर निर्घृण हत्या, मृतदेह शेतात पुरला

litsbros

Comment here