करमाळामाणुसकी

करमाळा पोलिसांची अशीही माणुसकी; परप्रांतीय तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबियांना केली सर्वतोपरी मदत

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा पोलिसांची अशीही माणुसकी; परप्रांतीय तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबियांना केली सर्वतोपरी मदत

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील भाळवणी ते केम रेल्वे मार्गा दरम्यान (डाऊन लिंक) येथे एका अज्ञात तरुणाचा मृतदेह रेल्वे कर्मचाऱ्यांना आढळून आला होता. मयताजवळ सापडलेल्या नुसत्या आधार कार्डावरून मृतकाचे नाव पिंटूकुमार छगनराम मेघवाल असल्याचे कळाले.

बाकी ओळख पटणे आणि नातेवाईकांचा शोध घेणे हे जिकीरीचे असले तरी करमाळा पोलीस स्टेशनचे पो.ह. संतोष देवकर आणि पो.ह. निखिल व्यवहारे यांनी राजस्थानमधील मयताचा मावस भाऊ जोगाराम नारायणलाल मेघवाल याच्याशी संपर्क साधून या दुर्दैवी घटनेची माहिती दिली.

यानंतर मयताच्या नातेवाईकाच्या ताब्यात मृतदेह देण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्यांना करमाळा येथे पाचारण करण्यात आले. अतिशय हलाखीची परिस्थिती असलेल्या नातेवाइकाची दयनीय अवस्था पाहून पोलीस कर्मचारी संतोष देवकर तसेच निखिल व्यवहारे यांनी यांनी त्या नातेवाईकांचे सांत्वन करून त्यांना मानसिक आधार दिला.

त्यांच्या जेवणाची, स्वखर्चाने व्यवस्था केली. त्यानंतर मृतदेह मयताच्या गावी नेण्यासाठीची सर्व व्यवस्था लावून दिली.मयत पिंटूकुमार हा कापडाचा व्यवसाय करत होता. जयपूरहून कापड खरेदीसाठी तो हैदराबाद येथे निघाला होता. परंतु भाळवणी ते केम दरम्यान रेल्वेतून पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्याचा मृतदेह सापडून आल्यापासून ते नातेवाईकांना संपर्क साधून तो त्याच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करण्यापर्यंत करमाळा पोलीस स्टेशनचे पो. उ. नि. मिठू जगदाळे, पो. ह. संतोष देवकर, पो.ह. निखील व्यवहारे, पोलीस चालक शिंदे यांनी केलेले सहकार्य पाहून मृतकाच्या नातेवाइकाना काहीवेळ का होईना, आपल्या दुःखाचा विसर पडला.

करमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी पो.उ.नि. जगदाळे, पो.ह. देवकर, पो.ह. व्यवहारे आणि पोलिस चालक शिंदे यांनी सामान्य जनतेप्रती दाखवलेल्या आपुलकीचे कौतुक केले आहे.

litsbros

Comment here