धायखिंडी येथे खून झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली; तरुणावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल
करमाळा (प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यातील धायखिंडी येथे एकाचा खून झाला आहे, अशी खोटी माहिती पोलिसांना फोन करून सांगणाऱ्या तरुणा विरोधात करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, करमाळा तालुक्यातील श्री देवीचामाळ येथील तरुण रोहन दिलीप सोरटे या तरुणाने 112 या सरकारी पोलीस मदत क्रमांकावर फोन करून धायखिंडी येथे खून झाला असल्याची माहिती पोलिसांना दिली.
त्यानंतर पोलिसी सूत्रे हलली, पोलीसानी घटनास्थळी भेट दिली , धावाधाव केली पण त्या ठिकाणी अशी कोणतीही घटना, खून झाला नसल्याचे निष्पन्न झाले.
सदर तरुणाने केवळ अफवा पसरवून पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने ही कृती केल्याचे दिसून आले.
त्यानंतर पोलिसांनी सदर तरुणावर करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
Comment here