करमाळाक्राइम

करमाळा पोलिसांची वाळूमाफियांवर मोठी कारवाई; ‘या’ चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा पोलिसांची वाळूमाफियांवर मोठी कारवाई; ‘या’ चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

उमरड(प्रतिनिधी) दिनांक 12/06/2021 रोजी ढोकरी गावाच्या कडेला भीमा नदीच्या पात्रातून यांत्रिक बोटी च्या साह्याने अवैध वाळू उपसा होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस विभागाला मिळाली लगेच करमाळा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस नाईक गणेश शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ कांबळे यांचे टिमणे कारवाई केली.

त्यात बोट मालक विकास देवकर (राहणार शहा तालुका इंदापूर बोटीवरील कामगार),  सलीम रहमान शेख (वय ३० राहणार झारखंड), नुरुल खाइज शेख (वय तीस वर्ष पश्चिम बंगाल), इकरामुल बिसल शेख (वय 35 झारखंड) या आरोपी विरोधात करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा- सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी होईना; लॉकडाऊन बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढले ‘हे’ आदेश

उमरड व पोफळज येथील बेकायदेशीर देशी व हातभट्टी दारू जप्त व विक्री करणाऱ्या विरोधात करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

 सदरची फिर्याद पोलीस नाईक कांबळे साहेब यांनी दिली असून वरील आरोपी कडून एक वाळू वाहतुकीची बोट किंमत 6,40,000/ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून वाळूची बोट वाहून नेण्यास अवजड असल्याने व वाळू पर्यावरणाच्या दृष्टीने नदीत असणे आवश्यक असल्याने सदरची बोट होळी च्या मदतीने पाण्याच्या मध्यभागी नेऊन तिला छिद्र पाडून खोल पाण्यात बडवून देण्यात आली.

सदर गुण्यातील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तळपे करत असून या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. अशाप्रकारे तालुक्यात काही अवैध धंदे होत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे साहेब यांनी केले सदर कारवाईचे तालुक्यातून कौतुक होत आहे.

litsbros

Comment here