करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

महसूल कर्मचाऱ्याला मारहाण करून वर्षांपासून फरार असणाऱ्या माजी उपसभापतीला करमाळा पोलिसांनी केली अटक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

महसूल कर्मचाऱ्याला मारहाण करून वर्षांपासून फरार असणाऱ्या माजी उपसभापतीला करमाळा पोलिसांनी केली अटक

करमाळा प्रतिनिधी जामखेड येथील महसूल कर्मचाऱ्याला मारहाण करून फरार असलेल्या जामखेड येथील उपसभापती ला अखेर एक वर्षानंतर करमाळा पोलिसांनी आज अखेर गजाआड केले आहे.

पोलीस ठाणे भाग 5 गुरंनं 772/20 20 भादवि कलम 353 379 332 336 323 504 506 147 149 व पर्यावरण कायदा कलम 9 व 15 मधील फरार आरोपी नामे दीपक नानासाहेब वाळुंजकर रा जवळा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर हा एक वर्षापासून फरार होता.

आज दिनांक 29 5 2021 रोजी आरोपी नामे दीपक नानासाहेब वाळुंजकर राहणार जवळा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर हा पोथरे गावच्या शिवारात आला असल्याची माहिती मिळाली.

पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष देवकर पो कॉ चंद्रकांत ढवळे पोलीस कॉन्स्टेबल तोफिक काझी कॉन्स्टेबल सोमनाथ जगताप यांनी फरारी आरोपी नामे दीपक नानासाहेब वाळुंजकर यांना ताब्यात घेऊन गजाआड केले आहे.

हेही वाचा- लस होत्या २०, आम्हाला मिळाले टोकन क्र. १९/२० ; ३ तास बसवून ठेवले आणि लस संपली म्हणून सांगितले; वीटच्या ‘फ्रंट लाईन वर्कर’ची तक्रार; चौकशी अन कारवाई होईल का.?

अखेर ठरलं! असे होणार दहावीचे गुणदान; कसा होणार ११ वी ला प्रवेश; वाचा सविस्तर धोरण

सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते मॅडम माननीय अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे माननीय उपविभागीय अधिकारी डॉ विशाल हिरे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने कारवाई केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि तळपे हे करीत आहेत.

litsbros

Comment here